आईने पैसे आणायला सांगितल्याचे सांगून दागिन्यांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:59 AM2020-06-22T00:59:11+5:302020-06-22T00:59:27+5:30

आणि आईने तिजोरीतून पैसे आणायला सांगितल्याचा बनाव करत लाखोंच्या दागिन्यावर हात साफ केल्याची घटना पायधुनीत घडली आहे.

Jewelry theft by telling mother to bring money | आईने पैसे आणायला सांगितल्याचे सांगून दागिन्यांची चोरी

आईने पैसे आणायला सांगितल्याचे सांगून दागिन्यांची चोरी

Next

मुंबई : मुलांना बाहेरून कुलूप लावून आई-वडील सामान खरेदीसाठी घराबाहेर पडले. घर बंद असल्याचे पाहून चोरांनी शिताफीने कुलूप तोडले. मात्र आत प्रवेश करताच मुले पाहून तेही भांबावले. आणि आईने तिजोरीतून पैसे आणायला सांगितल्याचा बनाव करत लाखोंच्या दागिन्यावर हात साफ केल्याची घटना पायधुनीत घडली आहे.
पायधुनी परिसरात राहणारे मोहंमद रहेमान खान (३७) यांच्या घरात ही चोरी झाली आहे. ते माथाडी कामगार आहेत. ते पत्नी आणि तीन मुले (१२, ९ आणि ७ वर्षीय) यांच्यासोबत राहण्यास आहेत. १८ जून रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास ते पत्नीसोबत सामान खरेदीसाठी बाहेर पडले. मुलांच्या सुरक्षेसाठी घराबाहेर कुलूप लावले. तासाभराने ते घरी परतले तेव्हा, दरवाजाचा कडीकोयंडा उचकटल्याचे दिसले. त्यांनी आत धाव घेताच मुले सुखरूप होती. त्यांनी घरात कोणी आले होते का? याबाबत चौकशी करताच, मुलांनी सांगितले की, एक २० ते २५ वयोगटातील अनोळखी तरुण घरात आला, आणि त्याने सांगितले की, अम्मी नीचे खडी है.. बारीश में भीग रही है और अम्मीने लॉकर से पैसे मंगाये है, म्हणताच, मुलांनी लॉकर उघडला. आणि आरोपी दागिने, पैसे घेऊन पळून गेल्याचे सांगितले.
पोलिसांनी अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात त्यांचे चार लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. मुलांनी केलेल्या वर्णनानुसार पायधुनी पोलीस अधिक तपास करत आहेत.
>घरात मुले सुखरूप
१८ जून रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास ते पत्नीसोबत सामान खरेदीसाठी बाहेर पडले. मुलांच्या सुरक्षेसाठी घराबाहेर कुलूप लावले.
तासाभराने ते घरी परतले तेव्हा, दरवाजाचा कडीकोयंडा उचकटल्याचे दिसले. मुले सुखरूप होती.

Web Title: Jewelry theft by telling mother to bring money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.