जिजाऊ विद्यार्थी गुणगौरव समारंभ २०२३ मोठ्या उत्साहात संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 10:17 AM2023-04-29T10:17:36+5:302023-04-29T10:18:49+5:30
या भागांतील युवकांनी केवळ कारकून शिपाई या पदांवरतीच समाधान न मानता अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजेत आणि ते स्वप्न पूर्ण केले पाहिजे.
मुंबई: जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचे सुपुत्र धीरज यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक २५ एप्रिल रोजी जिजाऊ एमपीएससी/ यूपीएससी अकॅडमी व वाचनालय तसेच जिजाऊ पोलीस अकॅडमी मधील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते झडपोली BBS स्कूल येथे संपन्न झाला.
या भागांतील युवकांनी केवळ कारकून शिपाई या पदांवरतीच समाधान न मानता अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजेत आणि ते स्वप्न पूर्ण केले पाहिजे. गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे जर इथला विद्यार्थी मागे पडत असेल तर अश्या विद्यार्थ्यांसाठी आपण सक्षमपणे उभे केले पाहिजे हा ध्यास जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी घेतला होता. त्याच अनुषंगाने संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी एमपीएससी/ यूपीएससी (MPSC/UPSC) अकॅडमी व वाचनालय व पोलीस ॲकडमी चालू करण्यात आल्या. यामुळेच संस्थापक सांबरे यांनी घेतलेला ध्यास किती दूरदृष्टीने विचार करून घेतला होता हे लक्षात येते. आज या ॲकडमीतून ५०० हून अधिक अधिकारी तर १९८ पोलीस कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत आहेत.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थापक निलेश सांबरे म्हणाले की एकेकाळी मला ही ॲकडमी चालू केली तेव्हा लोक हिणवायचे की या मातीतून कसले अधिकारी घडणार आहेत? तेव्हा मी शपथ घेतली की या मातीची अशी मशागत करेन की या मातीतून एक नाही १०० अधिकारी घडवेन. आज हे अधिकारी घडताना बघून उर अभिमानाने भरून येतोय असेही ते म्हणाले. तर यावेळी उपस्थित असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी एक आठवण सांगताना म्हणाले की लोखंडाचे परीस करणारी व्यक्ती म्हणजे निलेश सांबरे अशी सोन्यासारखी माणसं घडवताना मी स्वत: अनुभवले आहे. असे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
जिजाऊच्या सहकार्याने आणि दिलेल्या पाठबळामुळे या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश त्यांची मेहनत याचे कौतुक व्हावे आणि पुढील काळातही त्यांच्या संघर्षाची यशोगाथा व्हावी त्यांचा उत्साह आणखी वाढवावा या हेतूने जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचे सुपुत्र धीरज यांच्या वाढदिवसानिमित्त या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते झडपोली BBS स्कूल येथे संपन्न झाला. उपस्थित सर्वच मान्यवरांनी जिजाऊच्या उपक्रमांचे कातुक केले.
या प्रसंगी आयपीएस अधिकारी प्रशांत डगले , उद्योजक तुषार राउळ, पोलीस निरीक्षक प्रदीप गीते , गोदरेज कंपनीचे अधिकारी निखील वाहित्रा ,चार्टटेड अकाऊनटट अनुप पटेल, हर्षद पाटील , विक्रमगड नगरपंचायतचे कार्यकारी अधिकारी अजय साबळे , उप पोलीस निरीक्षक सतीश जगताप , पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे , जिजाऊ संस्थेचे आधार स्तंभ भगवान सांबरे , संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, उद्योजक आणि निलेश सांबरे यांचे चिरंजीव धीरज सांबरे , जिजाऊच्या पालघर जिल्ह्याची महिला सक्षमीकरणाचे अध्यक्षा हेमांगी पाटील ,जिजाऊच्या महिला सक्षमीकरण प्रमुख मोनीक पानवे , विक्रमगड नगराध्यक्ष निलेश पडवळे, उप नगराध्यक्ष महेंद्र पाटील. पालघर जि.प . सदस्य ज्ञानेश्वर (शिवा)सांबरे, यांसह अनेक मान्यवर मंडळी तसेच जिजाऊ एमपीएससी/ यूपीएससी (MPSC/UPSC) अकॅडमी व वाचनालय तसेच जिजाऊ पोलीस अकॅडमी मधील यशस्वी झालेले विद्यार्थी तसेच आताचे नवोदित विद्यार्थी हे आपल्या पालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.