शिंदे सरकारच्या निर्णयाचा फटका; जि. प., पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 06:40 AM2022-08-06T06:40:25+5:302022-08-06T06:40:37+5:30

राज्य सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि  पंचायत समिती अधिनियम, १९६१  मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश ४  ऑगस्टला प्रसिद्ध केला.

Jilha parishad, Panchayat committee elections postponed due to Eknath shinde's descision | शिंदे सरकारच्या निर्णयाचा फटका; जि. प., पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर

शिंदे सरकारच्या निर्णयाचा फटका; जि. प., पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या जागांमध्ये राज्य सरकारने बदल केल्याने राज्य निवडणूक आयोगाने २५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत २८४ पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया आहे त्या स्तरावर शुक्रवारी स्थगित केली. त्यामुळे दोन्हींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडतील. 

२५  जि. प. आणि त्या अंतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना शुक्रवारी प्रसिद्ध होणार होती. त्याचबरोबर १३  जि. प. आणि त्या अंतर्गतच्या  पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी ८ ऑगस्ट २०२२  रोजी, तर १२  जिल्हा परिषदा आणि  त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी १०  ऑगस्ट २०२२  रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित केली असून, पुढील आदेश देण्यात येतील, असे आयोगाने स्पष्ट केले. 

राज्य सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि  पंचायत समिती अधिनियम, १९६१  मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश ४  ऑगस्टला प्रसिद्ध केला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या संख्येत बदल केला असून, सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना, तसेच आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित केली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी स्पष्ट केले. 

प्रक्रिया स्थगित  
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, बीड, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, वर्धा, नांदेड, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली.

Web Title: Jilha parishad, Panchayat committee elections postponed due to Eknath shinde's descision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.