जीना हाऊस पाडा - लोढा
By admin | Published: March 27, 2017 04:24 AM2017-03-27T04:24:34+5:302017-03-27T04:24:34+5:30
पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जीना यांचे मुंबईतील निवासस्थान ‘जीना हाऊस’ तोडून त्या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र
Next
मुंबई : पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जीना यांचे मुंबईतील निवासस्थान ‘जीना हाऊस’ तोडून त्या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. यासंदर्भात केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनाही पत्र पाठविल्याचे लोढा यांनी सांगितले.
शत्रू संपत्तीला वारसा कायदा लागू होणार नाही व त्याचे हस्तांतरण ताबेदाराकडून शत्रूकडे किंवा संबंधितांकडे होणार नाही अशी तरतूद असलेले शत्रू संपत्ती विधेयक राज्यसभेत नुकतेच मंजूर झाले आहे. त्यामुळे जीना यांच्या कुटुंबीयांना अथवा पाकिस्तानला या घरावर दावा करता येणार नाही. त्यामुळे हे घर पाडून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा दिसेल अशी वास्तू बांधावी, अशी मागणी लोढा यांनी केली. (प्रतिनिधी)