Join us

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 2:22 PM

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

ठाणे-जितेंद्र आव्हाड यांच्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता आव्हाडांच्या वकिलांकडून जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्या वतीने ऍड प्रशांत कदम यांनी आव्हाडांच्या अटकेवर युक्तिवाद केला.आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्याचा युक्तिवाद ऍड कदम यांनी केला आहे. 

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर न्यायालयात सुनावणीला सकाळी सुरुवात झाली. आव्हाड यांच्या वतीने ऍड प्रशांत कदम यांनी आव्हाडांच्या अटकेवर युक्तिवाद केला.आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्याचा युक्तिवाद ऍड कदम यांनी केला आहे. दाखल करण्यात आलेले गुन्हे जाणीवपूर्वक करण्यात आले असून कलम ७ हा वाढवू शकत नाही, कारण तशी तरतूद १९३२ साली करण्यात आली आहे जी महाराष्ट्रात लागू होत नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी देखीलमी स्वतःहून चौकशी करता आलो होतो असे सांगत तपासाला मी पूर्ण सहकार्य केले असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.

ही अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावाही कदम यांनी केला आहे.सरकारी वकील म्हणून ऍड अनिल नंदीगिरी कोर्टात पोलिसांची बाजू मांडत आहे.

या कलमाअंतर्गत आव्हाडांना केली अटक...

आव्हाडांना जेव्हा ताब्यात घेण्यात आल्यानंतर आय पी सी 141,143,146,149,323,504, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(3), 135 हे कलम लावण्यात आले होते .त्यानंतर कलम 7 वाढवून त्यांना तसेच त्यांच्या सोबत 11 जणांना अटक करण्यात आली असूनकलम ७ हा वाढवू शकत नाही, कारण तशी तरतूद १९३२ साली करण्यात आली आहे जी महाराष्ट्रात लागू होत नसल्याचे आव्हाडांचे वकील ऍड कदम यांनी युक्तिवाद केला आहे.

टॅग्स :जितेंद्र आव्हाड