Jitendra Awhad: 'मंदिरावरचे' भोंगे काढा म्हटल्यानंतर आव्हाडांची गाण्यातून नैसर्गिक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 05:29 PM2022-05-05T17:29:02+5:302022-05-05T17:30:25+5:30
जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मनसैनिकांना केले आहे
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंग्याबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील सभेत त्यांनी भोंगे उतरवण्याबाबत ३ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. रमजान ईदच्या सणात कुठलिही अडचण नको असे म्हणत राज यांनी 4 तारखेपासून मनसैनिकांना मंदिरांवर भोंगे लावून हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले. दरम्यान, या गोंधळामुळे पोलिसांनी सर्वच प्रार्थनास्थळांना नोटीस बजावत रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत भोंगे वाजविण्यास बंदी घातली. त्यावरुन, आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गाण्यातून भावना व्यक्त केल्या आहेत.
जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मनसैनिकांना केले आहे. त्यांचे त्याचबरोबर नुसते मशिदीवरील नाही. तर सर्वच प्रार्थनास्थळांवरील भोंगे उतरायला हवेत असेही त्यांनी औरंगाबादच्या सभेत सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यावी. असे प्रार्थना स्थळांना पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरावरीलही भोंगे बंद होऊ लागले आहेत.
मंदिरावरील भोंग्यांतून काकडी आरती बंद झाल्याने खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपवर टीका केली आहे. भाजपने राज ठाकरेंच्या हाताने हिंदुत्वाचा गळा गोठला, त्यामुळं हिंदू समाज राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे त्यांनी म्हटले. तर, मंदिरावरील भोंगे हटविण्याची वेळ आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांच्या भावना एका गाण्यातून शेअर केल्या आहेत. आखीर क्यों या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजातील आणि दिवंगत स्मिता पाटील यांच्या भूमिकेतील गाण्याचे शब्द शेअर केले आहेत.
दुश्मन ना करे दोस्त ने
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 5, 2022
वो काम किया है
उम्र भर का गम
हमे ईनाम दिया है
तूफाँ में हमको छोड़ के
साहिल पे आ गये
तूफाँ में हमको छोड़ के
साहिल पे आ गये.
दुश्मन न करे दोस्त ने
वो काम किया है
…..
मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हंटल्या नंतरची नैसर्गिक प्रतिक्रिया
दुश्मन ना करे दोस्त ने
वो काम किया है
उम्र भर का गम
हमे ईनाम दिया है... अशीच नैसर्गिक भावना असल्याचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
मनसेच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हिंदूंना - राऊत
"ज्या गोष्टी भाजपाला जमत नाहीत. अशा गोष्टी लहान पक्षांना हाताशी घेऊन गेल्या जात आहेत. भाजपाने आज राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठी करुन घेतला आहे. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा डाव आखला जात आहे. आज जर सर्वाधिक फटका कुणाला बसला असेल तर तो हिंदूंना बसला आहे. पहाटेच्या काकड आरतीला अनेक मंदिरांमध्ये केवळ मोजक्या लोकांनाच उपस्थित राहता येत असतं. पण मंदिरांवरील लाऊडस्पीकरवरुन परिसर आणि गावातील लोक काकड आरतीचे साक्षीदार होत असतात. आजच्या आंदोलनामुळे हिंदू मंदिरांमध्ये काकड आरतीही झालेली नाही. याची नाराजी अनेक हिंदूंनी आमच्याकडे व्यक्त केली आहे. आज राज्यात शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसारख्या पवित्र धार्मिक स्थळांमध्ये काकड आरती होऊ शकलेली नाही", असं संजय राऊत म्हणाले.