Jitendra Awhad: आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीवर उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?; गृहमंत्र्यांसोबत झाली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 09:48 AM2020-04-09T09:48:20+5:302020-04-09T09:48:54+5:30

भाजपाचे नेते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही जेलभरो आंदोलन करु असा इशारा देखील भाजपाने दिला आहे. 

Jitendra Awhad News: CM Uddhav Thackeray held a meeting with Home Minister Anil Deshmukh and Minister Jitendra Awhad mac | Jitendra Awhad: आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीवर उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?; गृहमंत्र्यांसोबत झाली बैठक

Jitendra Awhad: आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीवर उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?; गृहमंत्र्यांसोबत झाली बैठक

googlenewsNext

मुंबई: राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहे. भाजपाचे नेते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही जेलभरो आंदोलन करु असा इशारा देखील भाजपाने दिला आहे. 

जितेंद्र आव्हाडाच्या बंगल्यावरील मारहाणीच्या प्रकरणावर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालेले आहे. तसेच पोलिसांवरही कारवाई करण्यासंबंधित दबाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत बुधवारी बैठक घेतली. या बैठकीत या मारहाणीच्या प्रकरणावर सविस्तर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता जितेंद्र आव्हाडांबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jitendra Awhad: त्याला मारलं ते चांगलंच केलं, कारण...; आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं 'मनसे' समर्थन

तत्पूर्वी मारहाणीच्या या सर्व प्रकरणावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की,  माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नको नको त्या पोस्ट करतो आहे. मला माझे कार्यकर्ते याबाबत अनेकदा सांगायचे पण मी याकडे दुर्लक्ष केले. मी गेले २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयातील कामात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचा सर्व प्रकार मला सोशल मीडियाद्वारे समजला असल्याचे प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

'मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं'; मारहाण प्रकरणावर आव्हाडांनी सोडलं मौन

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांना पत्र; मारहाणीच्या घटनेवरून काही प्रश्न!

देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. तसेच सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही असा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Read in English

Web Title: Jitendra Awhad News: CM Uddhav Thackeray held a meeting with Home Minister Anil Deshmukh and Minister Jitendra Awhad mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.