Jitendra Awhad: मी हेच पाच वर्षं भोगलं; माझ्या हत्येचा कटही रचला गेला पण...; आव्हाडांचं पुन्हा ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 11:28 AM2020-04-09T11:28:49+5:302020-04-09T11:42:57+5:30
Jitendra Awhad Latest News: फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एका तरुणाला आव्हाड यांच्या बंगल्यासमोर बेदम मारहाण केली. राजकीय वर्तुळातून आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
मुंबई: राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहे. भाजपाचे नेते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही जेलभरो आंदोलन करु असा इशारा देखील भाजपाने दिला आहे. तसेच सोशल मीडियावर देखील जितेंद्र आव्हाडांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमिवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत एक सवाल उपस्थित केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन काही सोशल मीडियावरील पोस्टचे फोटो शेअर केले आहेत. या फोटमध्ये जितेंद्र आव्हाडांना धमक्या दिल्याचे उघड झाले आहे. तसेच सोशल मीडियावर धमक्या देणाऱ्या व्यक्तीचे छोटा राजनसोबत संबंध असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच गेले पाच वर्ष मी हेच भोगले आहे. माझी हत्या करण्याचा कट देखील रचला होता. मात्र तेव्हा कुणी अवक्षर देखील काढले नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
हेच जे मी पाच वर्ष भोगले
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2020
फ़ोटो बघून समजलेच असेल
माझ्या घराची रेकी झाली
माझी हत्या करण्याचे प्लानिंग झाले
कोणि अवक्षर काढले नाही
आईचे आशीर्वाद pic.twitter.com/BkX7BAd20U
है मी पाच वर्ष भोगले
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2020
घराची रेकी झाली
कुणी केली
हत्या करण्याचे ठरले
कोण होते त्यात
असो
आईचे आशीर्वाद
पुलिस कारवाई करतील ह्यावर@OfficeofUT@AnilDeshmukhNCP@ThaneCityPolice@MumbaiPolice@CPMumbaiPolicepic.twitter.com/mk6fMEWjTI
दरम्यान, फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एका तरुणाला आव्हाड यांच्या बंगल्यासमोर बेदम मारहाण केली. राजकीय वर्तुळातून आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. यासंदर्भात आव्हाड यांनी लोकमतशी चर्चा केली. एखाद्या मंत्र्याने अशा पध्दतीने कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला असता, आव्हाड म्हणाले की, मी कधीच कायदा हातात घेत नाही. तीन-चार दिवसांपासून सदर मनुष्य अश्लील शिविगाळ करत आहे. माझ्या मुलीवर, बायकोवर बलात्कार करणार, अशा धमक्या देतो. माझ्याच नावाचे फेक अकाऊंट तयार करतो. माझा दाभोळकर होणार म्हणून ट्विट केले जाते. एक माणूस अमरावतीवरुन येतो. तो सांगतो, आम्ही थेट गोळ्या घालतो डोक्यामध्ये, त्यामुळे कोण कायदा हातात घेतो, याचा विचार करणे गरजेचे आहे. मुळात मी अशा पोस्टकडे कधीच लक्ष देत नाही. आपण आपले काम करत राहायचे, हेच मी कार्यकर्त्यांनाही सांगत असतो असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
'मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं'; मारहाण प्रकरणावर आव्हाडांनी सोडलं मौन
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांना पत्र; मारहाणीच्या घटनेवरून काही प्रश्न!
'निश्चितच तुझे हातपाय मोडले असते', जितेंद्र आव्हाडांना पोलीस अधिकाऱ्याची धमकी