jitendra Awhad: तुम्ही हिरा निवडला... आव्हाडांनी सांगितला अस्पृश्य परिषदेचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 01:54 PM2022-03-22T13:54:26+5:302022-03-22T14:25:41+5:30

1 व 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर येथील माणगाव येथे अस्पृशांची परिषद झाली होती.

jitendra Awhad: You chose the diamond ... Awhad told the history of the Untouchable Council fo ambedkar and shahu maharaj | jitendra Awhad: तुम्ही हिरा निवडला... आव्हाडांनी सांगितला अस्पृश्य परिषदेचा इतिहास

jitendra Awhad: तुम्ही हिरा निवडला... आव्हाडांनी सांगितला अस्पृश्य परिषदेचा इतिहास

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 21 आणि 22 मार्च या दोन दिवसांचं इतिहासातील महत्त्व विषद केलं आहे. आव्हाड यांनी भलीमोठी फेसबुक पोस्ट लिहून 21 व 22 मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे झालेल्या अस्पृशांची परिषदेची आणि त्यातील राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढेलेल्या उद्गारांची माहिती दिली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 व 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर येथील माणगाव येथे अस्पृशांची परिषद झाली. होती डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज या दोन महामानावांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते ते आपल्याला इतिहासात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात, असे म्हणत त्यांनी या अस्पृश्य परिषदेत शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे नेते होतील, अशी भविष्यवाणी केली होती. 

काय आहे आव्हाड यांची पोस्ट

माणगाव येथील परिषदेत पहिल्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात बोलत असतांना, इथल्या अस्पृशांच्या राजकीय, सामाजिक, गुलामगिरीला,त्यांच्या दुःखाला इथल्या मनुवादी व्यवस्था जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण सर्वांनी मिळून त्या विरोधात बंड पुकारून आवाज उठवण्याचे आव्हान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
तर त्याच परिषेदेत दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 मार्च रोजी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या भाषणात, कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, महार वतन आणि ब्राह्मणी कुलकर्णी वतनाची जुलुमी प्रथा नष्ट करणे, सर्वच जातींतील लोकांना, तलाठी, वकील म्हणून काम करण्याची संधी मिळने, असे अनेक महत्वपूर्ण निर्णय शाहू महाराजांनी घेऊन एका प्रकारे अस्पृशांना न्याय देण्याचे काम केले.
राजषी शाहू महाराज परिषदेतील लोकांना संबोधित असतांना म्हणतात, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपात, तुमचा खरा पुढारी तुम्ही हिरा निवडला आहे, त्या बद्दल अभिनंदन.
पुढे म्हणाले माझी खात्री आहे की डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही इतकेच नाही तर एक वेळ अशी येईल की ते सर्व हिंदुस्तानाचे पुढारी होतील अशी माझी मनू देवता मला सांगते."
मानगाव परिषदेमुळे छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही नवी जोडी महाराष्ट्राच्या सामाजिक शिक्षितजावर निर्माण झाली आणि यानिमित्ताने स्पृश्य जातीतील लोकांना प्रतिनिधित्व मिळायला लागले. त्यांना मानसन्माची वागणूक मिळायला लागली.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच यापुढे देशातील अस्पृश्य दलित वर्गाचे नेतृत्व करतील अशी ऐतिहासिक घोषणा याच माणगावच्या परिषदेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजानिक आयुष्याच्या प्रारंभ 21 व 22 मार्च 1920 साली आयोजित केलेल्या मानगावच्या परिषेदेतेच झाला.
आजच्या या ऐतिहासिक दिनानिमित्त, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!
जय भीम.
-डॉ. जितेंद्र आव्हाड.
 

Web Title: jitendra Awhad: You chose the diamond ... Awhad told the history of the Untouchable Council fo ambedkar and shahu maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.