Join us  

जितेंद्र यांना ‘राज कपूर जीवनगौरव’

By admin | Published: April 18, 2016 1:56 AM

राज्य शासनाच्या वतीने राज कपूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र्र आणि विशेष योगदान पुरस्कार अभिनेते अनिल कपूर यांना घोषित करण्यात आला आहे.

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने राज कपूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र्र आणि विशेष योगदान पुरस्कार अभिनेते अनिल कपूर यांना घोषित करण्यात आला आहे.सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला राज कपूर जीवनगौरव व राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्कार रुपये पाच लाख तर विशेष योगदान पुरस्कार रुपये तीन लाख आहे. येत्या ३० एप्रिल रोजी बोरीवलीत जनरल अरुणकुमार वैद्य मैदानावर होणाऱ्या सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच हॉलीवूड चित्रपटसृष्टीमध्ये अभिनयाचा ठसा उमटविणारे अनिल कपूर जन्माने आणि कर्माने मुंबईकर. अनिल कपूर यांनी हमारे तुम्हारे या उमेश मेहरा दिग्दर्शित हिंदी चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तेलगूतील वंश वृक्षम (१९८०) अभिनेत्याच्या भूमिकेनंतर ‘वो सात दिन’ या चित्रपटात नायकाची भूमिका बजावली. तेजाब (१९८८) हा चित्रपट त्यांचा सर्वाधिक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. अभिनयाबरोबर निर्माता म्हणून अनिल कपूर यांनी ‘बधाई हो बधाई, माय वाइफ्स मर्डर, गांधी माय फादर, शॉर्टकट, नो प्रॉब्लेम’ इ. चित्रपटांची निर्मिती केली आहे. (प्रतिनिधी)शंभरहून अधिक चित्रपट हिटपंजाब प्रांतात जन्मलेल्या जितेंद्र यांचे बालपण मुंबई येथे व्यतीत झाले. व्ही.शांताराम यांच्या ‘नवरंग’ चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्याच ‘गीत गाया पत्थरोंने’मध्ये मुख्य नायक म्हणून काम करताना जितेंद्र्र यांना पहिली मोठी संधी मिळाली. त्यानंतर जितेंद्र यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यातील १०० हून अधिक चित्रपट हे बॉक्स आॅफिसवर हिट ठरले आहेत. जिने की राह, हमजोली हे सन १९६८ ते १९७१ या काळातील त्यांचे सर्वाधिक यशस्वी ठरलेले चित्रपट आहेत.