Sanjay Raut Press Conference : ७ कंपन्या अन् कोट्यवधींची खंडणी; कोण आहेत राऊतांनी आरोप केलेले जितेंद्र नवलानी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 04:53 PM2022-03-08T16:53:37+5:302022-03-08T16:58:49+5:30

खंडणी रॅकेटमध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश; ईडीचे काही अधिकारी लवकरच तुरुंगात जातील; राऊतांचा हल्लाबोल

Jitendra Navlani running ransom racket with ed alleges shiv sena mp sanjay raut | Sanjay Raut Press Conference : ७ कंपन्या अन् कोट्यवधींची खंडणी; कोण आहेत राऊतांनी आरोप केलेले जितेंद्र नवलानी?

Sanjay Raut Press Conference : ७ कंपन्या अन् कोट्यवधींची खंडणी; कोण आहेत राऊतांनी आरोप केलेले जितेंद्र नवलानी?

Next

मुंबई: Sanjay Raut Press Conference :-  सक्तवसुली संचलनालयाचे अधिकारी खंडणीचे रॅकेट चालवतात. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेतेदेखील सहभागी आहेत. येत्या काही दिवसांत ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जातील, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही काही नेत्यांच्या तक्रारी ईडीकडे केल्या. मात्र त्यांनी काहीच कारवाई केली नाही. आता मुंबई पोलीस याचा तपास करतील, असं राऊत पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले.

जितेंद्र नवलानी ईडीचा वसुली एजंट म्हणून काम करत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकल्यावर त्या कंपन्या नवलानीच्या ७ कंपन्यांमध्ये पैसा जमा करतात. त्यानंतर कंपन्यांविरोधात सुरू असलेली कारवाई थंडावते. ईडीकडून सुरू असलेल्या या खंडणी रॅकेटमध्ये भाजप नेत्यांचादेखील सहभाग आहे. त्यांची नावं लवकरच पुढे आणू, असं राऊत यांनी सांगितलं.

ईडीच्या एका अधिकाऱ्यानं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर त्या अधिकाऱ्यानं भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यानं भाजपच्या ५० उमेदवारांचा खर्च केला आहे. ईडी आता भाजपची एटीएम झालीय. याबद्दल मी २८ पानांचं एक पत्र पंतप्रधान मोदींना लिहिलं आहे. कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. अशी आणखी १० पत्रं मी मोदींना लिहिणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.

Read in English

Web Title: Jitendra Navlani running ransom racket with ed alleges shiv sena mp sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.