जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यातील ३२ पोलिसांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 12:53 AM2020-06-09T00:53:12+5:302020-06-09T00:53:34+5:30

पोलिसांवर हल्ल्याच्या २६१ घटना घडल्या असून यात ८६ पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल करून ८४५ आरोपींना अटक केली आहे.

J.J. 32 policemen from Marg police station beat Corona | जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यातील ३२ पोलिसांची कोरोनावर मात

जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यातील ३२ पोलिसांची कोरोनावर मात

googlenewsNext

मुंबई : राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या घटत असल्याचे चित्र राज्य पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. गेल्या २४ तासात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ६०ने घटली आहे. तर सर्वात जास्त कोरोनाबाधित पोलीस असलेल्या जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यातील ३२ पोलिसांनी कोरोनावर मात करत, पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. राज्यभरात ३४ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्य पोलीस दलातील १९६ पोलीस अधिकारी व १ हजार २४१ पोलीस अंमलदार अशा एकूण १ हजार ४३७ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांवर हल्ल्याच्या २६१ घटना घडल्या असून यात ८६ पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल करून ८४५ आरोपींना अटक केली आहे.   यातच, जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात सर्वाधिक  पोलिसांना बाधा झाल्याने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पोलीस
ठाण्याला भेट देत त्यांचे मनोबल वाढवले. यात ३२ पोलीस कोरोनावर मात करत, पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. तर अन्य पोलिसांवर उपचार सुरू आहेत. 

Web Title: J.J. 32 policemen from Marg police station beat Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.