जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांची न्यायालयाने केली सुटका, निकालाने मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 06:01 AM2017-10-01T06:01:59+5:302017-10-01T06:02:23+5:30

एका सफाई कामगाराला जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपातून सत्र न्यायालयाने जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांची सुटका केली.

J.J. The hospital's governor Tatyarao Lohi has been acquitted by the court, | जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांची न्यायालयाने केली सुटका, निकालाने मोठा दिलासा

जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांची न्यायालयाने केली सुटका, निकालाने मोठा दिलासा

Next

मुंबई : एका सफाई कामगाराला जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपातून सत्र न्यायालयाने जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांची सुटका केली. खटल्यादरम्यान संबंधित कर्मचाºयाने आपण केलेले आरोप खोटे असून तक्रार मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्याआधारे शुक्रवारी सत्र न्यायालयाने डॉ. लहाने यांना दिलासा दिला.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २०१४ मध्ये नारायण वाघेला या चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचाºयाने कामावर असलेल्या सर्व सफाई कर्मचाºयांना कामकाज बंद ठेवण्यास सांगितले. कारण त्या वेळी ते संपावर होते. यावरून लहाने व वाघेला यांच्यात वाद झाला. या वेळी लहाने यांनी त्या कर्मचाºयाला जातिवाचक शिव्या दिल्या.
मात्र, लहाने यांनी हा आरोप फेटाळला आहे. ‘मी स्वत: भटक्या विमुक्त समाजाचा आहे. त्यामुळे मी जातिवाचाक शिवी देणे शक्य नाही,’ असे लहाने यांच्या वतीने अ‍ॅड.
स्वप्ना कोदे यांनी न्यायालयाला सांगितले.
२१ आॅगस्ट रोजी या घटनेचा प्रत्यक्षदर्शी ललित सोळंकी ‘फितूर’ झाला. त्यानंतर लहाने यांनी या आरोपातून मुक्तता करण्यात यावी, यासाठी न्यायालयात अर्ज केला. दरम्यान, वाघेला यांनी स्वत:च तक्रार मागे घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. लहाने यांच्यावर चुकीचे आरोप केल्याने ही तक्रार मागे घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती वाघेला यांनी न्यायालयाला केली.
अ‍ॅड. कोदे यांच्या म्हणण्यानुसार, सरकारी वकिलांनी एक साक्षीदार न्यायालयात हजर केला. मात्र हा साक्षीदार नीट ऐकू शकत नाही. त्यामुळे न्यायालयाने लहाने यांची सुटका केली.

Web Title: J.J. The hospital's governor Tatyarao Lohi has been acquitted by the court,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.