Join us

प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिकांचे जे.जे. रुग्णालयात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:06 AM

मुंबई - राज्यातील सरकारी रुग्णालयात परिचारिकांनी २१ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आणि दोन तास कामबंद आंदोलन केले. यात जे.जे. ...

मुंबई - राज्यातील सरकारी रुग्णालयात परिचारिकांनी २१ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आणि दोन तास कामबंद आंदोलन केले. यात जे.जे. रुग्णालयातील ३७५, सेंट जॉर्ज रुग्णालयातील १७५ आणि जीटी रुग्णालयातील १०० परिचारिका सहभागी झाल्या होत्या. त्याचसोबत राज्यभरातील सर्व शासकीय रुग्णालयांतील परिचारिका यात सहभागी झाल्या होत्या. मात्र, यानंतरही मंत्री महोदयांनी भेट न घेतल्याने पुढील

दोन दिवस २ तास कामबंद, दोन दिवस पूर्ण दिवस कामबंद आणि तरीही सरकारने लक्ष न दिल्यास २५ जूनपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे. पदभरती, पदोन्नती, कोविडभत्ता, रजा आणि इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. त्यानुसार दोन दिवस २ तास कामबंद, दोन दिवस पूर्ण दिवस कामबंद, तरी या आंदोलनानंतर मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत आंदोलनाला सामोरे जावे लागेल. या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने पत्रदेखील पाठवले आहे.

राज्य शासनाला वारंवार साकडे घालून मागण्या मान्य होत नसल्याने या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी परिचारिकांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. हा संप त्यांनी पुकारला आहे. कोरोनाकाळात राज्यभरातील परिचारिका संपावर गेल्या तर त्याचा मोठा फटका आरोग्य यंत्रणेला बसणार आहे.