पोलिसांशी हुज्जत घालणारे जे.जेचे तीन डॉक्टर अटकेत
By Admin | Published: October 19, 2015 02:26 AM2015-10-19T02:26:44+5:302015-10-19T02:26:44+5:30
वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करत हुज्जत घालून कामात अडथळा आणणाऱ्या जे.जेच्या तीन डॉक्टरांना रविवारी पहाटे ताडदेव पोलिसांकडून अटक करण्यात आली.
मुंबई : वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करत हुज्जत घालून कामात अडथळा आणणाऱ्या जे.जेच्या तीन डॉक्टरांना रविवारी पहाटे ताडदेव पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सोबो सेंटर परिसरात पोलीस हवालदार जगन्नाथ सोनावणे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत वाहनांची तपासणी करत होते. भरधाव कार पाहताच ही कार पोलिसांकडून थांबवण्यात आली. या कारमधून जे.जे. रुग्णालयातील वेद रावेश, राहुल जैन, आणि शिव महिंदेरु हे प्रवास करत होते. कार चालवणाऱ्या चालकाकडे पोलिसांनी परवाना मागितला. तसेच तिघांचीही ब्रेथ अल्कोहोलिक अॅनलायझर मशिनद्वारे तपासणी करण्यात आली. यात त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी तिघांनीही पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ करण्यास आणि धमकी देण्यास सुरुवात केली. एकाने पोलीस हवालदार सोनावणे यांची कॉलर पकडली. या घटनेनंतर या तिघांविरोधात ताडदेव पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)