मालवाहतुकीत ‘जेएनपीटी’ची रेकॉर्डब्रेक कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 07:44 AM2022-04-11T07:44:42+5:302022-04-11T07:44:47+5:30
सन २०१८-१९ मध्ये जवाहरलाल नेहरू बंदरात ५.१३ टीईयू माल हाताळण्यात आला होता.
कोेरोना संकट मागे सरत असताना मुंबईतील बंदरांमधील उलाढाल वाढली आहे. देशातील सर्वांत मोठ्या बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) २०२१-२२ या आर्थिक वर्षात तब्बल ५.६८ दशलक्ष टीईयू (वीस-फूट समतुल्य एकक) मालहाताळणी करीत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. आजवर इतकी मालवाहतूक जेएनपीटी बंदरातून झाली नव्हती.
सन २०१८-१९ मध्ये जवाहरलाल नेहरू बंदरात ५.१३ टीईयू माल हाताळण्यात आला होता. ही आजवरची सर्वाधिक कामगिरी होती. मात्र, सरत्या आर्थिक वर्षात तब्बल ५.६८ दशलक्ष टीईयू मालहाताळणी करीत जेएनपीटीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात १७.२६ टक्के वाढ झाली आहे.
किती कंटेनर वापरले?
६,०९२
(२०२०-२१)
६,२७८
(२०२१-२२)
असाही विक्रम...
- जेएनपीटीच्या न्हावा शेवा गेटवे टर्मिनल आणि भारत मुंबई कंटेनर टर्मिनलने अनुक्रमे १.१८६ दशलक्ष आणि १.२४५ दशलक्ष टीईयू मालाची हाताळणी केली.
- या दोन्ही टर्मिनलनी यंदा प्रथमच १ दशलक्ष टीईयूचा टप्पा ओलांडला आहे.
- त्यामुळे दोहोंच्या कामगिरीत अनुक्रमे ५२.१२ टक्के आणि ३३.३९ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदविण्यात आली.