इन्स्टावर जॉबची जाहिरात, गृहिणीने गमावले ८ लाख, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 10:20 AM2024-01-29T10:20:58+5:302024-01-29T10:21:22+5:30

Mumbai: माझगावमधील गृहिणीवर पार्टटाइम जॉबच्या नादात खाते रिकामे झाल्याची वेळ ओढवली. सायबर ठगांच्या टास्क फसवणुकीत महिलेला आठ लाख १७ हजार रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे.

Job ad on Instagram, housewife lost 8 lakhs, case registered against unknown accused | इन्स्टावर जॉबची जाहिरात, गृहिणीने गमावले ८ लाख, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

इन्स्टावर जॉबची जाहिरात, गृहिणीने गमावले ८ लाख, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई - माझगावमधील गृहिणीवर पार्टटाइम जॉबच्या नादात खाते रिकामे झाल्याची वेळ ओढवली. सायबर ठगांच्या टास्क फसवणुकीत महिलेला आठ लाख १७ हजार रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, भायखळा पोलिस अधिक तपास करत आहेत. 
माझगावमध्ये राहणाऱ्या फरहीन या पतीचे काम बंद पडल्याने ऑनलाइन पार्ट टाइम नोकरीच्या शोधात होत्या. दि. ६ जानेवारीच्या दुपारी त्यांना इन्स्टाग्रामवर एक पार्टटाइम जाॅबची जाहिरात दिसली. उत्सुकतेपोटी फरहीन यांनी या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर जेफरी स्मिथ नावाचा व्हाॅट्सॲप चॅट ओपन झाले.  

फरहीन यांना त्यांचा बायोडाटा विचारण्यात आला. त्यानंतर त्यांच्याकडून बॅंक खात्याची माहिती घेऊन एक लिंक पाठविण्यात आली. फरहीन यांनी लिंकवर क्लिक करताच, आकांक्षा नावाच्या टेलिग्राम यूजरशी जोडल्या गेल्या. या घटनेमुळे माझगाव परिसरात खळबळ उडाली आहे. 

पेड टास्क देण्यास सुरुवात
टेलिग्राम खात्यावर आलेले काही व्हिडिओ त्यांना स्क्रिनशॉट काढून पाठविण्यास सांगण्यात आले. फरहीन यांनी तसे करताच त्यांच्या खात्यात एकूण २७७ रुपये जमा झाले. त्यामुळे फरहीन यांचा त्यावर विश्वास बसला. त्यांना आनंद इन्स्टा आणि फाॅर्मल एम्प्लाॅई नावाच्या टेलिग्राम ग्रुपवर जाॅइन करून घेत वेगवेगळ्या पेड टास्क देण्यास सुरुवात झाली. ६ जानेवारी ते दि. २३ जानेवारी या काळात फरहीन यांना वेगवेगळ्या टास्क देऊन त्यांच्याकडून एकूण आठ लाख १७ हजार रुपये उकळण्यात आले. नफा खात्यात दिसत होता. मात्र ते पैसे काढता येत नव्हते. अखेर त्यांनी घडलेला प्रकार कुटुंबीयांच्या सांगून भायखळा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.

Web Title: Job ad on Instagram, housewife lost 8 lakhs, case registered against unknown accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.