नोकरीच्या नावे फसवणाऱ्यास चार वर्षांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:07 AM2021-02-16T04:07:30+5:302021-02-16T04:07:30+5:30

गोवंडी पोलिसांची कारवाई : उरणमधून घेतले ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चेंबूर येथील खारदेवनगर परिसरात राहणारे पोपट ...

Job fraudster arrested after four years | नोकरीच्या नावे फसवणाऱ्यास चार वर्षांनी अटक

नोकरीच्या नावे फसवणाऱ्यास चार वर्षांनी अटक

Next

गोवंडी पोलिसांची कारवाई : उरणमधून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चेंबूर येथील खारदेवनगर परिसरात राहणारे पोपट आलदर यांना मुंबईतील महावितरण कार्यालयात कामाला लावतो असे सांगून दीड लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्याला गोवंडी पोलिसांनी तब्बल चार वर्षांनंतर अटक केली आहे.

अविनाश मनोहर ठाकूर असे या आरोपीचे नाव असून तो चार वर्षे फरार होता. २०१६ साली पोपट यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी या फसवणुकीत सामील असणारे मच्छींद्र पाटील व विजय गायकवाड या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र यातील तिसरा आरोपी अविनाश मनोहर ठाकूर हा पोलिसांना सापडत नव्हता. अखेर पोलिसांनी अविनाश यास उरण तालुक्यातील फुंदेगाव न्हावाशेवा येथून अटक केली.

Web Title: Job fraudster arrested after four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.