सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या 'त्या '५४२ उमेदवारांना नोकरीची संधी - गृहमंत्री  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 09:16 PM2020-08-20T21:16:33+5:302020-08-20T21:16:58+5:30

4 व 6 वर्षापूर्वीच्या भरतीतील पात्र

Job opportunities for 'those' 542 candidates trained in Security Corporation - Home Minister | सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या 'त्या '५४२ उमेदवारांना नोकरीची संधी - गृहमंत्री  

सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या 'त्या '५४२ उमेदवारांना नोकरीची संधी - गृहमंत्री  

Next

मुंबई, -महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना नव्याने प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र पोलीस दल भरती प्रक्रियेच्या २०१४ व १६ या वर्षातील पात्र पण निवड न झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने भरती प्रक्रिया करून त्यांची सुरक्षारक्षक म्हणून निवड केली होती. त्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण करण्यात आले होते. मात्र त्यापैकी ५४२ जणांनी नेमणूक स्वीकारली नाही.त्यापैकी ५५ जणांनी महामंडळाकडे नेमणूक मिळावी याकरिता अर्ज केला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने गृहमंत्री महोदय यांच्यासमवेत पोलीस महासंचालक तथा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डी कनकरत्नम यांची सविस्तर बैठक झाली. महामंडळाने या उमेदवारांवर प्रशिक्षणासाठी खर्च केलेला आहे. तो पाहता तसेच या उमेदवारांच्या नोकरीची निकड पाहता या सर्वांना महामंडळात नेमणूक देण्याचे चर्चेअंती ठरले. त्या ५४२ पैकी जे उमेदवार नेमणुकीसाठी अर्ज करतील, त्यांना महामंडळात नेमणूक दिली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. .

Web Title: Job opportunities for 'those' 542 candidates trained in Security Corporation - Home Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.