नोकरीचा टक्का घसरला; पदे निघाली ३३ लाख, भरली फक्त ८ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 05:00 AM2019-04-21T05:00:06+5:302019-04-21T05:00:25+5:30
नोकरीचा टक्का घसरल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार समोर आले आहे.
मुंबई : नोकरीचा टक्का घसरल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार समोर आले आहे. ३३ लाख ६ हजार ९६२ पदे रिक्त झाली असली, तरी प्रत्यक्षातकेवळ ८ लाख २३ हजार १०७ बेरोजगारांनाच नोकरी मिळाली आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालयाकडून शकील शेख यांनी माहितीच्या अधिकारात रोजगाराची माहिती मिळवली. त्यानुसार राज्यात जानेवारी २०१४ पासून ते मार्च २०१९ पर्यंत एकूण ३३ लाख ४ हजार ३०५ अधिसूचित झालेल्या रिक्त पदांपैकी फक्त ८ लाख २३ हजार १०७ उमेदवारांना नोकरी मिळाली आहे. या वर्षात ३३ लाख पदांसाठी एकूण २८ लाख ९२ हजार ९०८ बेरोजगार उमेदवारांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे.
मात्र त्यांना अजून नोकरी मिळालेली नाही. राज्यात रोजगार वाढविण्यासाठी शासनामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना विविध सवलती देऊन आर्थिकदृष्ट्या बळकट करणे, आदिवासी उमेदवारांसाठी प्रशिक्षण आदी कार्यक्रमांतर्गत उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.