दुष्काळी भागातील तरुणांसाठी एसटीची ४,४१६ चालक तथा वाहकपदाची जाहिरात प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 10:06 AM2019-01-15T10:06:53+5:302019-01-15T19:20:09+5:30
औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे व सोलापूर या १२ जिल्ह्यांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुंबई - दुष्काळी भागातील तरुणांसाठी एस.टी.ची ४,४१६ चालक तथा वाहक पदाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे व सोलापूर या १२ जिल्ह्यांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मराठा आरक्षण व केंद्र शासनाने नुकतेच जाहीर केलेले १० टक्के आर्थिक दुर्बल आरक्षणासह जाहिरात देणारी एसटी महामंडळ ही राज्यातील पहिली संस्था आहे. १६ जानेवारीपासून ही जाहिरात msrtc.gov.in व msrtcexam.in या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. पदांसाठी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. चालक तथा वाहक म्हणजे चालक व वाहक पदाची एकत्रित पात्रता पूर्ण करणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
अशी असेल पात्रता
१) उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
२) उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना असणे आवश्यक
३) उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा
४) उमेदवाराकडे आर टी ओ चा चालक व वाहकाचा बिल्ला असणे आवश्यक