मुंबई : सिंगापूर, कॅनडामधील शिपिंग फोर्डमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार अंधेरीत उघडकीस आला. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.मूळचा उस्मानाबाद येथील रहिवासी असलेला भीमाशंकर अमृत ब्याळीकुळे (२४) याची ठगासोबत ओळख झाली. आरोपीने त्याला सिंगापूर, कॅनडामधील शिपिंग फोर्डमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून भीमाशंकरसह त्याच्या मित्रांनी यात गुंतवणूक केली. सर्वांनी एकूण साडेसात लाख यात आरोपीच्या खात्यात जमा केले.मात्र, पैसे भरूनही नोकरी मिळत नसल्याने, तक्रारदाराने पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. आरोपींकडून टाळाटाळ सुरू झाल्याने तरुणांना संशय आला. अखेर त्यांनी रविवारी अंधेरी पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने अंधेरीत ‘टीपी मेयर्स्क’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीद्वारे त्याने फसवणूक केल्याचा आरोप तरुणांनी केला आहे.>खेड्यातील तरुण रडारवरआरोपीने मुंबईसह खेड्या-पाड्यातील तरुणांना टार्गेट केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे.
परदेशामधील नोकरी तरुणांना पडली महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 1:54 AM