नोकरी गमावलेल्या ‘जेट’च्या कर्मचाऱ्यांना रोजगार मिळवून देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:58 AM2019-04-20T05:58:00+5:302019-04-20T05:58:10+5:30
जेट एअरवेज बंद पडल्याने बेरोजगार झालेल्या ‘जेट’च्या कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यासाठी जेटचा माजी कर्मचारी पुढे सरसावला आहे.
मुंबई : जेट एअरवेज बंद पडल्याने बेरोजगार झालेल्या ‘जेट’च्या कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यासाठी जेटचा माजी कर्मचारी पुढे सरसावला आहे. अमित वाधवानी असे त्यांचे नाव असून नोकरी गमावलेल्या जेटच्या कर्मचा-यांना ते आपल्या साई इस्टेट कन्सल्टंट कंपनीद्वारे रोजगार उपलब्ध करून देणार आहेत.
जेटमध्ये काम केल्याने जेटच्या सध्याच्या स्थितीबाबत दु:ख झाले असून कर्मचा-यांबाबत चिंता वाटते. त्यांची मन:स्थिती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काय करता येईल, याचा विचार करत असतानाच त्यांना रोजगार देण्याचे ठरवले. साई इस्टेट कन्सल्टंट या कंपनीद्वारे कर्मचाºयांना रोजगार देण्यात येईल, असे वाधवानी म्हणाले.
दरम्यान, कंपनीच्या विस्तारासाठी आम्हाला नवीन कर्मचाºयांची गरज आहे. कंपनीची सामाजिक जबाबदारी म्हणून यात जेटच्या कर्मचाºयांना सामावून घेण्यात येईल. सध्याच्या वेतनाप्रमाणेच त्यांना वेतन देण्यात येईल. त्यांच्यावर उपकार केलेत असे वाटू नये यासाठी त्यांच्या क्षमतेप्रमाणे व वेतनश्रेणीप्रमाणे कंपनीत सामावून घेण्यात येईल, असे कंपनीच्या मुख्य एचआर सलोमी पीटर्स म्हणाले. आॅडिट, बँकिंग व फायनान्स, डिजिटल मार्केटिंग आदी क्षेत्रांत या कर्मचाºयांच्या अनुभवाचा आम्हाला फायदाच होईल, असे ते म्हणाले.
>सध्याच्या वेतनाइतकेच मिळणार वेतन
सामाजिक जबाबदारीचे भान राखत तसेच जेटच्या कर्मचाºयांना त्यांच्यावर उपकार केलेत असे वाटू नये यासाठी त्यांची क्षमता, आताची वेतनश्रेणी यानुसारच त्यांना रोजगार देण्यात येईल, असे वाधवानी यांच्या साई इस्टेट कन्सल्टंटने स्पष्ट केले.