Join us

जोगेश्वरी हा शिवसेनेचा अभेद्य गड; आमदार विलास पोतनीस यांचा विश्वास

By मनोहर कुंभेजकर | Published: March 20, 2024 8:24 PM

आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात  मार्गदर्शन करण्यात आले. 

मुंबई-जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा अभेद्य गड आहे .स्वर्गीय राजेश्वर रागिनवार, देविदास साळशिंगरीकर, कांता गावडे, दामोदर कवठणकर यांनी या गडाचा पाया उत्तमरीत्या तयार केला आहे. 

येथील आमदार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले तरीही येथील जनता व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत ठामपणे उभे आहेत. यामुळे येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्व विधानसभेतून अमोल कीर्तीकर यांना भरघोस मताधिक्य मिळेल अशी ग्वाही मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समन्वयक व आमदार विलास पोतनीस यांनी दिली.

आमदार विलास पोतनीस यांनी जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शाखा क्र. 73,74,77,79 मधील सर्व पुरुष व महिला उपशाखाप्रमुख गटप्रमुख तसेच युवा व युवतीसेना बैठक जोगेश्वरी (पूर्व ) शिवसेना शाखे शेजारी बाल विकास मंदिर शाळेचे सभागृहात घेतली होती. तर शाखा क्र. 72, 78 मधील पदाधिकाऱ्यांची बैठक जोगेश्वरी पूर्व जैन मंदिर हॉल येथे घेण्यात आली. तसेच शाखा क्र. 52, 53 यांची बैठक शिवसेना शाखा गोकुळधाम येथे  येथे घेतली. या प्रसंगी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात  मार्गदर्शन करण्यात आले. 

यावेळी शिवसेना नेते व आमदार  सुनील प्रभू, महिला विभागसंघटक साधना माने, शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर,विधानसभा संघटक  विश्वनाथ सावंत, शालिनी सावंत,उपविभागप्रमुख जयवंत लाड,जितेंद्र वळवी, पदाधिकारी भाई मिर्लेकर, रवींद्र साळवी, राहुल देशपांडे, मयुरी रेवाळे, सुगंधा शेट्टये, निलाक्षी भाबल, माजी नगरसेवक बाळा नर ,पदाधिकारी भाई मिर्लेकर, रवींद्र साळवी, कैलासनाथ पाठक, दिपाशा पवार, शिला येरागी, लोना रावत, स्मिता साळशिंगरीकर आदी जोगेश्वरी पूर्व  विधानसभे मधील सर्व शिवसेना पुरुष व महिला शाखाप्रमुख, शाखा संघटक, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई