सीसीटीएनएसला जोडा ‘आधार’, मृतदेहांचे वारस शोधण्यात मदत, काय आहे सीसीटीएनएस प्रणाली? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 03:46 PM2023-05-15T15:46:27+5:302023-05-15T15:46:44+5:30

तसेच या प्रकरणी न्यायालयात याचिकाही दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

join Aadhaar to CCTNS, help in tracing heirs of dead bodies, know about What is CCTNS system | सीसीटीएनएसला जोडा ‘आधार’, मृतदेहांचे वारस शोधण्यात मदत, काय आहे सीसीटीएनएस प्रणाली? जाणून घ्या

सीसीटीएनएसला जोडा ‘आधार’, मृतदेहांचे वारस शोधण्यात मदत, काय आहे सीसीटीएनएस प्रणाली? जाणून घ्या

googlenewsNext

मुंबई : गुन्हेगारांची कुंडली ही सीसीटीएनएस (क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम) मिळते. त्यामुळे त्याचा अभिलेख पाहणे हे सोपे जाते. याच पार्श्वभूमीवर या यंत्रणेला आधार कार्ड संलग्न केल्यास बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यास सोपे जाईल, असे मत काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मांडले जात आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयात याचिकाही दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

-    सीसीटीएनएस हा एक पोलिस यंत्रणेचा भाग क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सीस्टिम असा त्याचा फुलफॉर्म आहे. 
-    प्रभावी पोलिसिंगसाठी सर्वसमावेशक आणि एकात्मिक प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत एक प्रकल्प आहे. 
-    पोलिस प्रक्रियेचे संगणकीकरण (एफआयआर, तपास, चलन) करणे, राष्ट्रीय गुन्हे आणि गुन्हेगारी नोंदींच्या डेटाबेसवर संपूर्ण देशात शोध घेण्यास मदत करणे, राज्य आणि केंद्रात गुन्हे व गुन्हेगारी अहवाल तयार करणे, वेब पोर्टलद्वारे नागरिक केंद्रीत पोलिस सेवा प्रदान करणे.
-    पोलिस ठाणे, न्यायालये, तुरुंग, न्यायवैद्यकशास्त्र आणि अभियोग यांच्यामध्ये गुन्हे आणि गुन्हेगारी डेटाचे सामायिकरण केले जाते, ज्यामुळे  तक्रारदाराला न्याय मिळण्यास मदत होते.

हरविलेल्या व्यक्तीची कधीच भेट होत नाही 
शहर असो वा रेल्वे रूळ किंवा आसपासच्या परिसरात सापडणाऱ्या शेकडो मृतदेहांची ओळख ही तांत्रिक कारणामुळे अखेरपर्यंत पटत नाही. मग आम्ही कायदेशीरपणे त्यांना बेवारस म्हणून घोषित करतो आणि त्यांचे अंत्यविधी उरकण्यात येतात. मात्र, ज्या व्यक्तीचा नातेवाइक (वडील, भाऊ, पती किंवा आई, मुलगी, बहीण) हरवला आहे ते मात्र शेवटपर्यंत आमचा माणूस परत येईल, याचीच वाट पाहत राहतात. 

 मृतदेह शवागृहात ठेवण्याचा खर्चही वाचेल
-    गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीचा ओळखपत्रविना मृतदेह आढळल्यास आम्ही आसपासच्या पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार आहे का, याची माहिती घेतो. 
-    मात्र, राज्याबाहेरून नोकरीच्या शोधात येणाऱ्यांचे नातेवाइक शाेधण्यास समस्या येतात. 
-    आधार कार्ड जोडल्यास त्या व्यक्तीचा पत्ता सापडून नातेवाइकांना मृतदेह सुपुर्द करता येईल, पोलिसांचा वेळ तसेच मृतदेह शवागृहात ठेवण्याचा खर्चही वाचेल, असे तपास अधिकारी सांगतात.

अद्याप ७५४ बेवारस मृतदेह सापडले   
गेल्या चार महिन्यांत म्हणजे जानेवारी २०२३ ते अद्याप शहर उपनगर आणि रेल्वे मिळून ७५४ बेवारस मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. 
 

Web Title: join Aadhaar to CCTNS, help in tracing heirs of dead bodies, know about What is CCTNS system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.