भविष्यात रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून मोठ्या संख्येने लोकमत समूहाच्या रक्तदान मोहिमेत सहभागी व्हा - महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:05 AM2021-06-30T04:05:33+5:302021-06-30T04:05:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना काळात आपण सर्वांनी अनेक अडचणींचा सामना केला आहे आणि करत आहोत. या काळात ...

Join Lokmat Group's blood donation drive in large numbers so that there is no shortage of blood in future - Mayor | भविष्यात रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून मोठ्या संख्येने लोकमत समूहाच्या रक्तदान मोहिमेत सहभागी व्हा - महापौर

भविष्यात रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून मोठ्या संख्येने लोकमत समूहाच्या रक्तदान मोहिमेत सहभागी व्हा - महापौर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळात आपण सर्वांनी अनेक अडचणींचा सामना केला आहे आणि करत आहोत. या काळात आपणाला मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. याचा सारासार विचार करत लोकमत समूहाने समाजाेपयाेगी कार्य म्हणून २ ते १५ जुलै दरम्यान राज्यभर आयोजित केलेल्या रक्तदान मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

भायखळा येथील महापौर निवासस्थानी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी ‘लोकमत रक्ताचं नातं’ या लोगोचे अनावरण केले. यावेळी महापाैर म्हणाल्या की, गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोनाशी लढा देत आहाेत. या काळात आराेग्याच्या, रक्ताच्या तुटवड्याच्या अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात रक्ताचा असा तुटवडा भासू नये आणि समाजाप्रती आपण काही तरी देणे लागतो या भावनेने लोकमत समूहाने २ ते १५ जुलै दरम्यान महाराष्ट्रात आयोजित केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेत माेठ्या संख्येने सहभागी होऊ या. लोकमत समूहाने आयोजित केलेल्या रक्तदान मोहिमेमुळे नक्कीच रक्ताचा तुटवडा कमी होण्यास मदत होईल. लोकमत समूहाने हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

..............................................

Web Title: Join Lokmat Group's blood donation drive in large numbers so that there is no shortage of blood in future - Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.