Join us

‘प्रधानमंत्री सुरक्षा विमात सहभागी व्हा’

By admin | Published: May 01, 2017 4:28 AM

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणने केले

मुंबई : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणने केले आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या दोन्ही योजनांचा कालावधी प्रत्येक वर्षासाठी १ जून ते ३१ मे असा राहणार आहे. विमा राशीची रक्कम प्रत्येकी रुपये २ लाख एवढी आहे. योजनांची सविस्तर माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, कर्मचाऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. (प्रतिनिधी)