सुलभ लसीकरणासाठी पालिका उपायुक्तांबरोबर संयुक्त बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:07 AM2021-05-11T04:07:06+5:302021-05-11T04:07:06+5:30
मुंबई : सध्या लसीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत सावळा गोंधळ आहे. त्यामुळे कांदिवली आणि बोरिवलीच्या नागरिकांचे लसीकरण लवकर आणि सुलभरित्या व्हावे, ...
मुंबई : सध्या लसीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत सावळा गोंधळ आहे. त्यामुळे कांदिवली आणि बोरिवलीच्या नागरिकांचे लसीकरण लवकर आणि सुलभरित्या व्हावे, यासाठी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी परिमंडल ७ चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्याबरोबर संयुक्त बैठक घेतली.
या बैठकीत प्रत्येक विभागात तत्काळ लसीकरण केंद्र सुरू करावे, यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी कांदिवलीस्थित ग्रोवेल मॉल येथे ड्राईव्ह - इन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली. यावेळी कांदिवलीच्या आर. दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे, उत्तर मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, भाजप मुंबई सचिव ज्ञानमूर्ति शर्मा, उपाध्यक्ष युनूस खान, भाजप उपनेता कमलेश यादव, नगरसेवक बाळा तावडे, प्रभाग समिती अध्यक्षा लीना दहेरकर, ग्रोवेल मॉलचे प्रतिनिधी अजय गुप्ता आदी उपस्थित होते.