पत्रकारितेचे अभ्यासक्रम यापुढेही सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 04:36 AM2018-07-25T04:36:15+5:302018-07-25T04:36:48+5:30

मुंबई विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

Journalism courses will continue to continue | पत्रकारितेचे अभ्यासक्रम यापुढेही सुरूच राहणार

पत्रकारितेचे अभ्यासक्रम यापुढेही सुरूच राहणार

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग अडचणीत आल्याच्या आणि तेथील अभ्यासक्रम बंद होणार असल्याच्या बातम्या विद्यापीठात चांगल्याच गाजल्या. त्यामुळे अखेर विद्यापीठ प्रशासनाने यावर पुनर्विचार करत ात्रकारितेचे अभ्यासक्रम बंद होणार नसल्याचे जाहीर केले. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचणार आहे.
पत्रकार व संज्ञापन विभागातर्फे विभागात सुरू असलेल्या मास्टर आॅफ आर्ट्स (कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नलिझम), मास्टर आॅफ आर्ट्स (पब्लिक रिलेशन), मास्टर आॅफ आर्ट्स (इलेक्शन मीडिया), मास्टर आॅफ आर्ट्स (टेलिव्हिजन स्टडिज) आणि मास्टर आॅफ आटर््स (फिल्म स्टडिज) हे अभ्यासक्रम सुरू आहेत. त्यापैकी तीन अभ्यासक्रम एक वर्षासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. विभागाने तडकाफडकी अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेताना कुलगुरूंना पत्रदेखील लिहिले. पदव्युत्तरमधील बराचसा अभ्यासक्रम हा जुना असून त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. सोबतच विभागात मनष्युबळ कमी असून फक्त ३ प्राध्यापकांवर विभागाची धुरा आहे. त्यामुळे इतक्या कमी मनुष्यबळात हे अभ्यासक्रम चालविणे शक्य होत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद केले होते.
विद्यार्थी अभ्यासक्रमाचे विद्यापीठात शुल्क भरतात त्या वेळी त्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. ती स्वीकारत त्यांना त्या सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, यावर प्रशासन काम करीत आहे. लवकरच आम्ही विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देऊ, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश कांबळे यांनी दिली.

Web Title: Journalism courses will continue to continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.