मुंबई : ‘रोटरी क्लब आॅफ बॉम्बे वेस्ट’च्यावतीने जागतिक प्रवासाला सोमवारी सुरुवात झाली आहे. एक आगळा-वेगळा विक्रम मुंबईतील व्यावसायिक प्रवीण मेहता आणि त्यांचे मित्र डॉ. सुधीर बलदोटा यांनी हाती घेतला आहे. ‘जग जोडा, शांतता अनुभवा, जीवनसाजरे करा’ असा संदेश जग प्रवासादरम्यान देणार आहेत.
आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका या उपखंडांमधून प्रवास करत ३०० दिवसांमध्ये ७० हजार किलोमीटरचा प्रवास पार करत ४ उपखंडातील ६० देश प्रादाक्रांत करणार आहेत. या प्रवासादरम्यान हे दोघे विविध देशांमधील साधारण १२० जणांना भेटणार आहेत. शास्त्रज्ञ, संशोधक, कलाकार, सामाजिक व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, रेडिओ जॉकी, लेखक, शिक्षक किंवा समाजामध्ये प्रगती घडवून आणणारी कोणतीही व्यक्ती अशा १२० जणांच्या भेटी घेतल्या जाणार आहेत. रोटरी क्लब आॅफ बॉम्बे वेस्टने या उपक्रमाला पाठबळ दिले असून ही एक परिवर्तनाच्या मार्गावरील यशोगाथा आहे, असे या जागतिक प्रवासाचे वर्णन क रण्यात आले आहे. डॉक्टर सुधीर बलदोटा म्हणाले की, मी छायाचित्रणामध्ये होमिओपथीची काही तत्वज्ञाने वापरली आहेत. म्हणजे एखाद्या विषयाकडे परिपूर्णपणे पाहणे आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवणे, या गोष्टी मी प्रत्यक्षात उतरवल्या आहेत. मला प्रवास छायाचित्रण करायला आवडते. प्रवास हे माझे पहिले प्रेम असून तीच गोष्ट छायाचित्रणाचीही आहे.
जग सुंदर करण्याचा प्रयत्नयंदाची रोटरीची संकल्पना ही ‘बी द इंस्पिरेशन’ ही आहे. पुढील वर्षासाठी घोषवाक्य ‘रोटरी कनेक्ट्स द वर्ल्ड’ असे असेल. पुढील रोटरी वर्षाची सुरुवात जुलै २०१९ मध्ये केली जाणार आहे. प्रतिभासंपन्न, वैचारिक स्पष्टता असलेले व्यक्तींना एकत्र आणणे आणि त्याद्वारे हे जग सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणे हे रोटरीच्या या प्रयत्नांमागील उद्दिष्ट आहे, अशी प्रतिक्रिया ‘रोटरी क्लब आॅफ बॉम्बे वेस्ट’चे अध्यक्ष आनंद गुप्ता यांनी दिली.