चेंबूर ते घाटकोपर प्रवास अवघ्या १५ मिनिटांत होणार शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 01:50 AM2020-10-04T01:50:20+5:302020-10-04T01:50:28+5:30

अमर महल जंक्शन येथील वाहतूक कोंडी सुटणार

The journey from Chembur to Ghatkopar is possible in just 15 minutes | चेंबूर ते घाटकोपर प्रवास अवघ्या १५ मिनिटांत होणार शक्य

चेंबूर ते घाटकोपर प्रवास अवघ्या १५ मिनिटांत होणार शक्य

Next

मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील गजबजलेल्या अमर महल जंक्शनची अखेर वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. या मार्गावर अडथळा ठरणारी बांधकाम महापालिकेने नुकतीच जमीनदोस्त केली. यामुळे ६० फुटांचा रस्ता आता १२० फुटांचा केला जाणार आहे. त्यामुळे चेंबूर ते घाटकोपर हा सध्या ४५ मिनिटांचा प्रवास वाहन चालकांना अवघ्या १५ मिनिटांत पार करता येणार आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगराकडे जाणारी वाहने अमर महल जंक्शन येथून वळतात. मात्र या मार्गावर काही दुकाने व निवासी गाळे असल्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण लांबणीवर पडले होते. महापालिकेने येथील १७७ दुकानदार आणि ४० रहिवाशांचे चेंबूर, टिळक नगर येथे पुनर्वसन केले होते. परंतु, येथील दुकानदाराने पालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. तिथे पालिकेच्या बाजूने निकाल लागल्यामुळे ही बांधकामे पाडून रस्ता मोकळा करण्यात आला.

या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अखेर सहा वर्षांनंतर सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार उर्वरित ५९ बांधकाम महापालिकेने गुरुवारी पाडली. सध्या चेंबूर ते घाटकोपरपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना ४५ मिनिटांचा कालावधी लागत आहे. मात्र घाटकोपर-माहुल मार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत अमर महल जंक्शन येथून घाटकोपरला पोहोचता येणार आहे.

न्यायालयात घेतली धाव
१७७ दुकानदार आणि ४० रहिवाशांचे चेंबूर, टिळकनगर येथे पुनर्वसन केले होते. परंतु, येथील दुकानदाराने पालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

Web Title: The journey from Chembur to Ghatkopar is possible in just 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.