पूजा दामलेमुंबई : मुंबईची ‘लाइफलाइन’ असणारी रेल्वे आता खरंच थकली आहे का? प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा भार जुनाट झालेल्या पायाभूत सुविधांवर पडत आहे. लोकलमधून जास्त महसूल मिळूनही रेल्वे प्रशासनाचे मूलभूत पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी प्रकरणानंतर प्रवासी सजग झाले असले तरीही रेल्वे प्रशासन मात्र थंडच आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकावरील पुलाची स्थिती पाहून हेच अधोरेखित होते. हा पूल मोडकळीस आला असूनही प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.चर्नी रोड स्थानकाच्या पूर्वेला असणाºया पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाला तडे गेले आहेत, रेलिंग कमालीचे गंजलेले आणि वाकलेले असून पुलाच्या सळ्या बाहेर डोकावत आहेत. शेकडो प्रवासी रोज या पुलावरून ये-जा करतात. पुलाची दुरुस्ती करावी, यासाठी प्रवासी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. पण, त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. इतर कुठलाही पर्याय नसल्याने पुलावरून जावेच लागते, असे प्रवाशांनी सांगितले.या पुलाखाली पदपथावर बेघर लोक राहतात. त्यामुळे पूल कोसळल्यास प्रवाशांसह या माणसांच्या जिवालाही धोका आहे.दोन वर्षांपासून पाठपुरावाचर्नी रोड स्थानकाचा विकास करणार असल्याचे आता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षांपासून येथील स्थानिक, प्रवासी याप्रकरणी पाठपुरावा करत होते.काम रखडलेचर्नी रोड स्थानकाच्या पुलाची दुरवस्था झाल्याने दुरुस्तीसाठी राजकीय पक्षदेखील पाठपुरावा करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी या पुलाचा काही भाग पाडण्यात आला आहे. पण, या ठिकाणाहून रेल्वेच्या मोठ्या प्रमाणात वायर जात असल्यामुळे हे काम रखडले आहे.डागडुजीचा उपयोग नाहीचरोजचा गर्दीचा प्रवास जीवघेणाच वाटतो. चर्नी रोडला उतरताना गर्दी कमी असली तरीही बाहेर पडताना नेहमीच अडचणी येतात. चर्नी रोडच्या पुलाची डागडुजी पावसाळ्याआधी करण्यात आली होती. पण, आता परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. त्यामुळे डागडुजी करून काहीही उपयोग झालेला नाही. नाहक पैशांचा मात्र चुराडा झाल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे. पुलाच्या पायºया तुटलेल्या आहेत. त्यामुळे घाईघाईत जाताना पडण्याची भीती वाटते. - कल्पना रावलपायºया उतरत्याचर्नी रोड स्थानकावरून मी रोज प्रवास करते. हिंदुजा महाविद्यालयाकडे जाणारा पूल नव्याने बांधला आहे. पण, त्याच्या पायºया नीट बांधलेल्या नाहीत. त्यामुळे पुलावरून चालताना प्रवाशांना नेहमीच पाय घसरून पडण्याची भीती सतावत असते. येथील पायºयांना उतरंड असल्याने पायरीवर नीट पाय ठेवताच येत नाही. पावसाळ्यात पाणी आणि चिखलामुळे येथून चालताना हमखास पाय घसरतो. स्थानकावर अगदी एका कोपºयात स्वच्छतागृह आहे. त्यामुळे महिलांसह पुरुष प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे. - जान्हवी शहापूल धोकादायकचर्नी रोड पश्चिमेकडून स्थानकावर येणाºया पुलाला तडे गेले आहेत. तसेच या पुलाच्या पायºयांची रुंदी कमी आहे. त्यामुळे या पुलावरून चालताना खूप त्रास होतो. पूल अत्यंत धोकादायक आहे. चर्नी रोड स्थानकावर सकाळी आणि संध्याकाळी बºयापैकी गर्दी असते. या वेळेत पुलावर अधिक भार आल्यास पूल पडू शकतो. पण, रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. दोन आणि तीन क्रमांकाचे फलाट लहान असल्याने दोन्ही बाजूने एकाच वेळी गाड्या येतात, तेव्हा प्रवाशांना थांबून राहावे लागते- पारुल वाडीभस्मेगर्दीच्या वेळीभीती वाटतेमी दररोज चर्नी रोड स्थानकावरून प्रवास करतो. गर्दी असताना फलाट क्रमांक २, ३ आणि ४ ला जोडणाºया पुलाच्या भागावरून जाताना भीती वाटते. कारण दोन्ही फलाटांवर लोकल आल्यास गर्दी प्रचंड वाढते. त्यातच काही प्रवासी या पुलावर उभे असतात. या पुलावरच्या फरशादेखील निघालेल्या आहेत. तसेच पूल अतिशय गंजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे येथून चालताना भीती वाटते. एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर तरी प्रशासानाचे डोळे उघडणार आहेत का?- अजितकुमार केसरीलोकल एकत्र आल्यावर धोका अधिकचर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक दोन आणि तीनवर एकत्र गाड्या आल्यावर गर्दी वाढते. फलाटांची रुंदी कमी आहे. दोन्ही बाजूंनी गाड्या आल्यावर गर्दी वाढते; तसेच पुलावर चढताना भीती वाटते. गर्दीच्या वेळी कोणाचा धक्का लागल्यास पुलावरून पडू की काय, अशी भीती वाटते. पुलावर चढल्यावरही जीव मुठीत घेऊनच चालत जावे लागते; कारण, हा पूल अतिशय मोडकळीस आलेला आहे.मानसी खैरनार
चर्नी रोड स्थानकात पुलाला तडे, जीव मुठीत घेऊन मुंबईकरांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 5:47 AM