रेड झोन ते रेड झोन राजधानीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 06:39 PM2020-05-12T18:39:49+5:302020-05-12T18:40:25+5:30

मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रवाशांची तपासणी; सुमारे १ हजार ४८७ प्रवाशांचा प्रवास

Journey from Red Zone to Red Zone Capital | रेड झोन ते रेड झोन राजधानीचा प्रवास

रेड झोन ते रेड झोन राजधानीचा प्रवास

Next

 

मुंबई :  मुंबई आणि दिल्लीत सध्या रेड झोन आहे. या रेड झोनमधून प्रवासी विशेष ट्रेन असलेली राजधानी एक्सप्रेस मंगळवारी सायंकाळी ५. ३० वाजता मुंबई सेंट्रल स्थानकावरून सुटली. या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी दुपारी १२ वाजल्यापासून स्थानकावर जमले होते. प्रत्येक प्रवाशाची तपासणी करून त्यांना ट्रेनमध्ये बसण्यास परवानगी देण्यात आली. या ट्रेनमध्ये सुमारे १ हजार ४८७ प्रवाशांनी प्रवास केला. 

कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी २२ मार्चपासून प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र ५० दिवसांनंतर  रेल्वे प्रशासनाने मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने पुन्हा रेल्वे सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील ३० वातानुकूलित ट्रेन सुरु केल्या आहेत. या ट्रेन नवी दिल्ली ते दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, अहमदाबाद व जम्मू-तावी या शहरांसाठी या गाड्या सोडण्यात येतील. परतीच्या प्रवासात पुन्हा त्याच स्टेशनवरून या गाड्या दिल्लीसाठी सुटण्याचे नियोजन रेल्वे प्रशासन केले आहे. 

मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली ‘राजधानी’ प्रमाणे ट्रेन धावली. या गाडीला ११ तृतीय श्रेणीचे एसी डबे आणि 5 द्वितीय श्रेणीचे एसी डबे आहेत.  नवी दिल्लीकडे प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी स्थानकावर मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून जमा झाले होते. रेल्वे सुरक्षा बळ, रेल्वे पोलीस यांची स्थंकावर सुरक्षा होती मुंबई सेंट्रल स्थानकावर ६ वैद्यकीय तपासणी केंद्र उभारण्यात आले आहेत. या केंद्रातून प्रवाशांची आणि त्यांच्या सामग्रीची तपासणी केली गेली. तपासणीवेळी प्रत्येक प्रवाशांनी मास्क घातले होते. रेल्वे डब्यात फिजिकल डिस्टन्सचे पालन करून आसन व्यवस्था केली होती. 

या विशेष  ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ, जेवण देण्यात येणार नाही. त्यामुळे तिकिट दरातून कॅटरिंगचे दर वजा करण्यात आले आहेत. त्यानुसार तृतीय श्रेणी एसीकरीता १ हजार ७९५, द्वितीय श्रेणी  एसीला २ हजार ५८५ तिकिट आकारण्यात आले.  मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली ट्रेन बोरीवली, सुरत, बडोदा, रतलाम, नागडा आणि कोटा स्थानकात थांबविण्याचे नियोजन होते. प्रवाशांनी स्वत:चे जेवण, पिण्याचे पाणी व अंथरूण-पांघरूण घेऊन आणले होते.

------------------------------------

 सुमारे १ हजार ४८७ प्रवाशांचा प्रवास  

मुंबई सेंट्रल स्थानकातून १ हजार १०७ प्रवासी ट्रेनमध्ये  चढले. त्यानंतर सुरत येथून ९७, बडोदा येथून ८३, रतलाम येथून २३ आणि कोटा येथून १७७ प्रवाशांनी विशेष ट्रेन असलेल्या राजधानीमधून नवी दिल्लीसाठी प्रवास केला. 

  ------------------------------------  

Web Title: Journey from Red Zone to Red Zone Capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.