रूबरू महोत्सवामधून ‘दानाचा आनंद’
By admin | Published: February 4, 2016 02:45 AM2016-02-04T02:45:49+5:302016-02-04T02:45:49+5:30
कॉलेज फेस्टिव्हल म्हणजे धमाल, मस्ती हे समीकरण असते, पण सामाजिकतेची बीजे विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या हेतूने दादरच्या नवीनचंद्र्र मेहता महाविद्यालयाने, ‘
मुंबई : कॉलेज फेस्टिव्हल म्हणजे धमाल, मस्ती हे समीकरण असते, पण सामाजिकतेची बीजे विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या हेतूने दादरच्या नवीनचंद्र्र मेहता महाविद्यालयाने, ‘रूबरू’ महोत्सवात सामाजिकतेचा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश केला आहे. यंदा या महोत्सवाची थीम ‘जॉय आॅफ गिव्हिंग’ म्हणजेच ‘दानाचा आनंद’ अशी आहे. समाजाच्या प्रत्येक घटकांना एकरूप करणे, हा या महोत्सवाचा हेतू आहे. ४ व ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या महोत्सवाला ‘लोकमत’ मीडिया पार्टनर आहे.
नवीनचंद्र मेहता महाविद्यालयाचा ‘रूबरू’ महोत्सव दरवर्षी विविध विषय घेऊन येतो. यातून सामाजिक संदेश पोहोचवणे हा हेतू असतो. यंदा महोत्सवासाठी ‘दानाचा आनंद’ अशी संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. इनडोअर-आउटडोअर गेम्स, लॅन गेम्स, टेक्नो स्किल्स, सांस्कृतिक या विभागात विविध स्पर्धा घेण्यात येतील. यात वक्तृत्व, पथनाट्य, पोस्टर मेकिंग, फोटोग्राफी, ट्रेझर हंट, बॉक्स क्रिकेट, रिंग फुटबॉल, कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ यांचा समावेश असेल. हा महोत्सव महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असून, आॅनलाइन नावनोंदणी करून या महोत्सवाचा आनंद लुटता येईल. या महोत्सवात अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या संचालक
सीमा पुरोहित यांनी केले आहे. (प्रतिनिधी)