मुंबई, 11 मार्च: आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून भारताची आघाडीची ट्रॅव्हल एजन्सी 'जॉय एन क्रू'ने लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर यांना ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी 'जॉय अँड क्रू'ने #webhataknare ची सुरुवात केली. या माध्यमातून जगभरात प्रवास करणाऱ्या मराठी पर्यटकांना आरामदायी आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रवासाचा समृद्ध अनुभव देण्याचा 'जॉय एन् क्रू' चा प्रयत्न असेल.'जॉय अँड क्रू'चे अनेक टूर पॅकेजेस आहेत. यामध्ये स्कँडिनेव्हिया, युरोप, केनिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपान ही ठिकाणे कव्हर केली जातात. ज्यात राहणं, जेवण, साईटसिइंगबरोबर मराठी पर्यटकांच्या सोयीसाठी मराठी बोलणाऱ्या टूर मॅनेजरची सुविधाही देण्यात येते.
मनोरंजन क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या अमृता खानविलकर यांनी 'राजी', 'सत्यमेव जयते' आणि 'मलंग' या बॉलीवूडच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. गोलमाल, साडे माडे तीन , नटरंग, कट्यार काळजात घुसली आणि चंद्रमुखी अशा सुपरहिट चित्रपटांत काम करून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त अमृता यांनी त्यांचा हरहुन्नरीपणा रिएलिटी शोमध्येही दाखवला. त्या 'नच बलिये'च्या विजेत्या होत्या.' खतरों के खिलाडी' आणि झलक दिखला जा या कार्यक्रमांमध्येही त्यांनी सहभाग घेतला. ही गुलाबी हवा, वाजले की बारा, चंद्रा, बाई गं या गाण्यांमुळेही त्यांना ओळखलं जातं. नृत्य अदाकारीमधल्या डायनॅमिक स्क्रीन प्रेझेन्समुळे अमृता यांनी रसिकांच्या मनावर भुरळ घातली आहे.
'जॉय एन् क्रू'च्या संस्थापिका प्रज्ञा अधिराज म्हणाल्या, “आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमृता यांना आमच्या ब्रँड अँबेसिडर बनवण्याचा आमचा निर्णय खूप अर्थपूर्ण आहे. त्या आजच्या आधुनिक स्त्रीचं प्रतिनिधित्व करतात. त्यांची क्रियाशीलता, कामाबाबत त्यांची असलेली उत्कटता आणि नेहमीच काहीतरी नवीन करण्याची त्यांची ऊर्जा इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा मनोरंजन क्षेत्रातला प्रवास आणि त्यांचं पर्यटनावरचं प्रेम यांमधून जॉय एन् क्रू ने केलेली त्यांची निवड किती अचूक आहे हेच सिद्ध होतं. आमचा हा ठाम विश्वास आहे की त्या जास्तीत जास्त पर्यटकांना, खास करून महिलांना, आत्मविश्वासाने आणि शानदारपणे नवनवीन जागांना भेटी देण्याचा आनंद अनुभवण्यासाठी प्रोत्साहित करतील.”
आपला आनंद व्यक्त करताना, अमृता खानविलकर म्हणाल्या, “पर्यटनातून मला नेहमीच आनंद मिळत असतो आणि त्यातून मला माझ्यातली मी अनुभवण्याची संधी मिळत असते. माझा हा ठाम विश्वास आहे की, प्रत्येक प्रवासामध्ये आपला पूर्ण कायापालट करण्याची ताकद असते. जॉय एन् क्रू ने खूप विचारपूर्वक पद्धतीने आखलेल्या सिग्नेचर ग्रुप टूर्समध्ये एक अचूक संतुलन आहे. यात तुमच्यासाठीच खास आखलेल्या कस्टमाइज्ड टूरचा आपलेपणा तर दिसून येतोच आणि तोही तुम्हाला परवडणाऱ्या ग्रुप टूरच्या खर्चात. जे एन सी सिग्नेचर ग्रुप टूर्सच्या पाहुण्यांसोबत या वर्षी मला चार ते पाच वेळा प्रवास करायला मिळेल, याचा मला खूप आनंद वाटत आहे. हा माझ्यासाठी मस्ती, साहस आणि आनंददायी आठवणींनी भरलेला असा एक अद्भुत अनुभव असेल! चला तर मग माझ्याबरोबर आणि या अविस्मरणीय सहलींचा अनुभव घ्या!”
जॉय एन् क्रू ची स्थापना २०२२ मध्ये झाली आणि त्यांनी अगदी अल्प अवधीतच प्रीमियम ट्रॅव्हेल सेगमेंटमध्ये आघाडीचं स्थान मिळवलं. आपल्या समजूतदार ग्राहकांसाठी थीमॅटिक पर्यटनाचा सर्वोत्तम अनुभव देणे ही यांची खासियत आहे. ही कंपनी त्यांच्या सिग्नेचर ग्रुप टूर्ससाठी प्रसिद्ध आहे. ज्यात कस्टमाइझ्ड पर्यटनाचा आपलेपणा मिळतो तोही ग्रुप टूर्सच्या परवडणाऱ्या खर्चात. हा एक असा अनोखा प्रयत्न आहे ज्याने भारतातील ग्रुप ट्रॅव्हेलला नव्याने एक वेगळा अर्थ मिळवून दिला. या व्यतिरिक्त जॉय एन् क्रू आता सिल्व्हर टुरिझमही घेऊन येत आहे. ज्यात फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाईन केलेल्या टूर्स आहेत. आमच्या साथीने सुलभ प्रवास, पौष्टिक आहार, सहजपणे फिरता यावं यासाठी रॅम्प्स, मेडिकल किट्स आणि प्रवासाचं एक सुटसुटीत टाइमटेबल, ज्यामुळे तुम्हाला आरामदायी, तणावरहित आणि समृद्ध अनुभव देणाऱ्या प्रवासाचा आनंद लुटता येईल.
भारतातील सहा शहरांमध्ये मजबुतीने पाय रोवल्यानंतर, जॉय एन् क्रू आता महत्त्वाकांक्षी विस्ताराच्या प्रगतीपथावर आहे. क्यूरेटेड प्रीमियम ट्रॅव्हेलच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी, एका वर्षात २० जागांवर प्रस्थापित होण्याचं त्यांचं लक्ष्य आहे. भारताबाहेरील शैक्षणिक टूर्सच्या क्षेत्रामध्येही कंपनी आता पाऊल टाकत आहे, ज्यात काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद आणि वर्ल्ड क्लास पर्यटनाचा अनुभव या दोन्हींचा संगम असेल.
कंपनीच्या व्हिजन बद्दल बोलताना, 'जॉय एन् क्रू'चे सीईओ संग्राम घोरपडे म्हणाले, “भारतातील प्रीमियम ट्रॅव्हेल सेक्टर आज अतिशय वेगाने वाढत आहे. पर्यटकांना कोणतेही अडथळे नसलेल्या, खऱ्याखुऱ्या सहलींचा आनंद अनुभवायचा आहे. या विकासाच्या मार्गावर जॉय एन् क्रू आघाडीवर आहे. अमृता यांच्याबरोबरची आमची भागीदारी अविस्मरणीय पर्यटनाचा आनंद मिळवून देण्याच्या आमच्या कटिबद्धतेला अधिक बळकटी देत आहे. जॉय एन् क्रू मधल्या त्यांच्या सहभागामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात आम्हाला मदत होईल आणि प्रीमियम ट्रॅव्हल सेक्टरमधील विश्वासार्ह लीडर म्हणून आमचं स्थान अधिक मजबूत होईल.”
जॉय एन् क्रू चे सह-संस्थापक राजन मूर्ती, म्हणाले, “नवीन शहरांमध्ये आमची वाढ झाल्यामुळे आणि सिल्व्हर टुरिझम आणि सिग्नेचर ग्रुप टूर्सच्या वाढत्या मागणीमुळे, जॉय एन क्रू बरोबरच्या पर्यटनाच्या भवितव्याबद्दल आम्हाला खूप उत्साह वाटत आहे.” जॉय एन् क्रू बद्दल थोडक्यात जॉय एन् क्रू ही एक प्रीमियम ट्रॅव्हल एजन्सी आहे जी तुम्हाला टेलर- मेड पर्यटनाचा अनुभव देते, तोही अनन्यसाधारण सुविधांनी युक्त आणि स्वस्त दरात. उच्च दर्जाचं आदरातिथ्य, सुटसुटीत, आखीव प्रवासाचं टाइमटेबल, आणि पर्सनलाइझ्ड सर्विस यावर भर देऊन, जॉय एन् क्रू, तुम्हाला तुमची प्रत्येक सफर अविस्मरणीय होईल याची हमी देते.