शीना हत्याकांडातील आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

By admin | Published: October 6, 2015 02:57 AM2015-10-06T02:57:06+5:302015-10-06T02:57:06+5:30

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी १९ आॅक्टोबरपर्यंत

Judicial custody of accused in Sheena murder case | शीना हत्याकांडातील आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

शीना हत्याकांडातील आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Next

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी १९ आॅक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. त्याचप्रमाणे सीबीआयने या प्रकरणाचा तपास काही दिवसांपूर्वी सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याने तीनही आरोपींची चौकशीसाठी दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी संजीव खन्ना आणि श्याम राय यांना दंडाधिकारी एम. आर. नातू यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर करण्यात आले, तर इंद्राणीचे वॉरंट कारागृह प्रशासनाने दंडाधिकाऱ्यांसमोर सादर केले. दंडाधिकाऱ्यांनी या तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडी १९ आॅक्टोबरपर्यंत वाढवली. सीबीआयनेही इंद्राणी, संजीव आणि श्याम यांची चौकशी करण्यासाठी दंडाधिकाऱ्यांपुढे सोमवारी अर्ज केला. अलीकडेच ही केस मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याने आरोपींची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असे सीबीआयने दंडाधिकाऱ्यांना सांगितले.

चौकशीसाठी सीबीआयचा अर्ज
या तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याने त्यांना पुन्हा पोलीस कोठडी मिळणे शक्य नाही. त्यामुळे त्यांची कारागृहातच चौकशी करण्याची मुभा सीबीआयने मागितली आहे. सीबीआयच्या या अर्जावर दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी सुनावणी ठेवली आहे.

Web Title: Judicial custody of accused in Sheena murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.