Join us

जुहू किनारा होणार स्वच्छ !, अक्षय कुमारचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 7:03 AM

आपल्या प्रत्येक सिनेमातून सामाजिक संदेश देणाऱ्या अभिनेता अक्षय कुमार याने जुहू समुद्रकिनारी बायो-टॉयलेट उभारण्यासाठी १० लाख रुपयांची मदत केली आहे. जुहू किनारा हागणदारीमुक्त व्हावा हा यामागचा उद्देश आहे. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या सिनेमाद्वारे अक्षय कुमारने शौचालयांचा प्रश्न संपूर्ण देशासमोर मांडला होता.

मुंबई - आपल्या प्रत्येक सिनेमातून सामाजिक संदेश देणाऱ्या अभिनेता अक्षय कुमार याने जुहू समुद्रकिनारी बायो-टॉयलेट उभारण्यासाठी १० लाख रुपयांची मदत केली आहे. जुहू किनारा हागणदारीमुक्त व्हावा हा यामागचा उद्देश आहे. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या सिनेमाद्वारे अक्षय कुमारने शौचालयांचा प्रश्न संपूर्ण देशासमोर मांडला होता. पण फक्त सिनेमांपुरतेच मर्यादित न राहता समाजाला आपण काही देणे लागतो, या भावनेतून अक्षय कुमारने हे समाजकार्य केले आहे.हे बायोटॉयलेट उभारताना समुद्रकिनारी दुर्गंधी पसरू नये, याकरिता बायो डायजेस्टर वापरण्यात आला आहे. अक्षय कुमार आता महापालिकेच्या मदतीने जुहूप्रमाणेच वर्सोवा किनाºयावरही अशा प्रकारे बायो-टॉयलेट उभारणार आहे. यासाठी अक्षय कुमारला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचीही मदत मिळणार आहे.काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाने टिष्ट्वटरवरून जुहू समुद्रकिनाºयावरचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत एक व्यक्ती उघड्यावर शौच करताना दिसत होती. या फोटोवर तिने लिहिले होते ‘गुड मॉर्निंग मुंबई’. यावरून तिला टिष्ट्वटवर बरेच ट्रोलिंग करण्यात आले होते. पण अक्षय कुमारने उचललेल्या या अभिनव पावलामुळे त्याचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे.वर्साेवा किनारीही उभारणार बायो-टॉयलेटजुहूप्रमाणेच वर्सोवा किनाºयावरही अशा प्रकारे बायो-टॉयलेट उभारणार आहे. बायो-टॉयलेटसाठी निधी उभा करण्यास अक्षय कुमारला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचीही मदत मिळणार आहे.

टॅग्स :मुंबईबातम्या