जुहू चौपाटीला झळाळी
By Admin | Published: June 24, 2016 05:29 AM2016-06-24T05:29:50+5:302016-06-24T05:29:50+5:30
समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा, भेळपुरीचा आस्वाद आणि आकाश पाळण्याचा आनंद लुटण्यासाठी शेकडो मुंबईकर व पर्यटक चौपाट्यांवर गर्दी करीत असतात़ मात्र प्रसिद्ध सिने तारकांचे वास्तव्य असलेल्या
मुंबई : समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा, भेळपुरीचा आस्वाद आणि आकाश पाळण्याचा आनंद लुटण्यासाठी शेकडो मुंबईकर व पर्यटक चौपाट्यांवर गर्दी करीत असतात़ मात्र प्रसिद्ध सिने तारकांचे वास्तव्य असलेल्या जुहू परिसरातील चौपाटीला तर वेगळेच महत्त्व आहे़ पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या या चौपाटीला लवकरच तसे रूप देण्यात येणार आहे़ त्यानुसार शिडाच्या नौकांचे मॉडेल तयार करून या चौपाटीचा किनारा रंगीबेरंगी रोषणाईने उजळणार आहे़
चौपाटीवर १२ मीटर उंचीचे वैशिष्ट्यपूर्ण असे शंभर खांब बसविण्यात येणार आहेत़ या प्रत्येक खांबावर टेन्साईल फॅब्रिकपासून तयार केलेल्या शिडाच्या नौकेचे मॉडेल बसविण्यात येणार आहे़ या नौकेच्या खालच्या बाजूने चार दिवे असतील़ समुद्राच्या भरतीच्या पाण्यावर व चौपाटीच्या वाळूवर प्रकाशाच्या साहाय्याने सामाजिक संदेशही देण्यासाठी या खांबावर गोबो प्रोजेक्टर्सदेखील असतील, अशी माहिती यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता जयंत बनसोड यांनी दिली़ खांबावर गोबो प्रोजेक्टर्स बसविण्यात येणार आहेत़ भरतीच्या पाण्यावर व चौपाटीच्या वाळूवर गरजेनुसार सामाजिक संदेश देण्यात येणार आहे़
दर्यावर डोलणार होडी
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व त्याभोवतालच्या परिसरात आकर्षक अत्याधुनिक स्वरूपाची विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे़ तसेच येथे बसविण्यात आलेल्या खांबाचा व शिडाच्या नौकेचा आकार हा चौपाटीवरच्या हवेच्या वेगाला अनुरूप असणार आहे़ (प्रतिनिधी)
४़५ कि़मी़ लांबीची चौपाटी आहे़ येथे गंजरोधक रंगाने रंगविलेले १२ मी़ उंचीचे शंभर खांब निश्चित अंतरावर बसविण्यात येणार आहेत़ प्रत्येक खांबावर ४़५ मीटर उंचीवर टेन्साईल फॅब्रिकपासून तयार केलेल्या शिडाच्या नौकेचे मॉडेल बसविण्यात येणार आहे़
या प्रत्येक नौकेच्या खालच्या बाजूने मंद प्रकाश देणारे व बदलते रंग असणारे चार दिवे बसविण्यात येणार आहेत़ नौकेच्या शिडामध्येही मंद प्रकाश असणारे बदलत्या रंगाचे दिवे बसविलेले असतील़ नौकेखालील व शिडीतील सर्व दिवे एलईडी असणार आहेत.