जुहू-मोरा किनाऱ्याची होतेय धूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 02:17 AM2020-03-15T02:17:49+5:302020-03-15T02:18:07+5:30

वेसावा शेवटच्या बस स्टॉपसमोरील देवाची वाडी ते सातबंगला सागरकुटीर समुद्रकिनारी असलेल्या झोपडपट्टीपर्यंत संरक्षक भिंत टाकण्यात येत आहे.

Juhu-Mora beach news | जुहू-मोरा किनाऱ्याची होतेय धूप

जुहू-मोरा किनाऱ्याची होतेय धूप

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) मुंबईच्या वर्सोवा बीच येथे १२ फूट उंचीवर संरक्षक भिंत बांधली आहे. समुद्रकिनारी होणा-या धूपेमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी सिमेंटचे टेट्रापॉड टाकण्याची त्यांची योजना आहे. कारण दरवर्षी या भागात उंचावलेल्या भागात पूरस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे वर्सोवा बीचवर संरक्षक भिंत बांधण्याचे काम जवळजवळ संपत आले आहे. वेसावा शेवटच्या बस स्टॉपसमोरील देवाची वाडी ते सातबंगला सागरकुटीर समुद्रकिनारी असलेल्या झोपडपट्टीपर्यंत संरक्षक भिंत टाकण्यात येत आहे.

वर्सोवा बीचवर बांधण्यात येणाºया संरक्षक भिंतीचा मोठा फटका आता जुहूच्या मोरागाव कोळीवाड्याला बसत आहे. येथील मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार आहे. येथील समुद्रकिनारी पर्यावरणाचे नुकसान होत असून किनाºयाची धूप होत असल्याने त्याचा परिणाम मोरागाव येथील समुद्रकिनाºयावर होत आहे. हा प्रकार कायम राहिला तर येथील समुद्रकिनाराच नष्ट होईल. त्यामुळे या प्रकरणात सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे संचालक गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी केली आहे.

दरम्यान, वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून वांद्रे ते वरळी हे अंतर वाहनाने केवळ ४ ते ५ मिनिटांत पार करता येत असले तरी शिवाजी पार्कच्या समुद्रकिना-याची धूप झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. माधव चितळे समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले आहे.

वर्सोवा किनारपट्टीवर संरक्षक भिंत बांधण्यास सुरुवात केल्यापासून त्याचा फटका जुहू मोरागाव किनारपट्टीला बसला आहे. येथे वेगाने धडकत असलेल्या लाटांनी समुद्रकिनाºयाची धूप होत आहे. येथे सुमारे ४० छोट्या व मोठ्या मच्छीमार बोटी असून, धूप झाल्याने बोटी शाकारण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही.
- राजेश मांगेला, सदस्य, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

Web Title: Juhu-Mora beach news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई