पोलीस दलाचा लौकिक कायम राहण्यासाठी प्रसंगी जुजबी उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:06 AM2021-04-11T04:06:18+5:302021-04-11T04:06:18+5:30

संजय पांडे; पोलीस दलाचा लौकिक कायम राहण्यासाठी प्रसंगी जुजबी उपचार जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काही अनुचित ...

Jujabi treatment on occasion to maintain the reputation of the police force | पोलीस दलाचा लौकिक कायम राहण्यासाठी प्रसंगी जुजबी उपचार

पोलीस दलाचा लौकिक कायम राहण्यासाठी प्रसंगी जुजबी उपचार

Next

संजय पांडे; पोलीस दलाचा लौकिक कायम राहण्यासाठी प्रसंगी जुजबी उपचार

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काही अनुचित प्रकरणांमुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रतिमेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सामान्य नागरिक आणि समाजातील सर्व घटकांचा पोलिसांवर विश्वास वाढेल, अशी पावले उचलण्यासाठी प्रयत्न केले जातील, परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली कार्यप्रणाली, प्रसंगी शासनाच्या सहकार्याने जुजबी उपचार पद्धती राबविली जाईल, असे राज्याचे नूतन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राज्य सरकारने ‘डीजीपी’पदाचा अतिरिक्त कार्यभार रजनीश सेठ यांच्याकडून पांडे यांना सोपविण्याबाबतचा आदेश शुक्रवारी रात्री जारी केला. शनिवारी सकाळी पांडे यांनी पोलीस मुख्यालयात हजर राहून पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर ‘लाेकमत’च्या प्रतिनिधीशी केलेली बातचीत :

प्रश्न- आपण राज्य सरकारवर नाराज होता, आता ती नाराजी दूर झाली का?

- आता हा विषय संपलेला आहे.

प्रश्न- अँटिलिया स्फोटक कार, सचिन वाझे, परमबीर सिंग यांचे आरोप, सीबीआय चौकशी आदींमुळे पोलीस दलाचे खच्चीकरण झाले आहे का?

- एखाद्या घटनेमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. महाराष्ट्र पोलीस हा देशातील एक आघाडीचा फोर्स आहे. त्याचा लौकिक कायम राहील, आपण प्रयत्न करू. नियमबाह्य, अनिष्ट प्रथा मोडीत काढू, त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले तरी आपण त्यामध्ये कुचराई करणार नाही. सर्व अधिकारी व कर्मचारी समन्वयाने काम करून महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक कायम राखतील.

प्रश्न- पोलीस दलाची धुरा आपल्याकडे आल्याने अनेक अधिकारी घाबरले आहेत?

- पोलीस हा कायदा आणि समाजाचा रक्षक असतो. त्यामुळे चांगल्या हेतूने काम करीत असताना काही चुका झाल्यास, ते समजू शकतो. मात्र, जर बेशिस्त वर्तन करून खात्याची बदनामी करत असल्यास ते आपण कदापि खपवून घेणार नाही.

प्रश्न- आपण काही अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे?

- सरकारने जी जबाबदारी सोपवली आहे. ती व्यवस्थित पार पाडली आहे. त्याबाबतचा पुढील निर्णय सरकार घेईल.

प्रश्न- पोलीस दलातील आयपीएस लॉबीबद्दलची आपली भूमिका काय?

- गेली ३५ वर्षे कोणत्याही लॉबी, दबावाला बळी न पडता काम केले आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, हीच अपेक्षा सर्वांकडून आहे. पोलीस दल सर्वोत्तम बनावे यासाठी सर्वांनी काम करावे हीच इच्छा आहे.

-----------

Web Title: Jujabi treatment on occasion to maintain the reputation of the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.