पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर आज जम्बो ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 07:43 AM2019-02-10T07:43:23+5:302019-02-10T07:47:09+5:30

पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान तर हार्बर मार्गावर सकाळी 11 ते 4.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून ते 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे दिशेकडे जाणारी एकही लोकल धावणार नाही.

Jumbo block on Western railway and Harbor rail route 10 February | पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर आज जम्बो ब्लॉक

पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर आज जम्बो ब्लॉक

Next
ठळक मुद्देकल्याण-कसारा लोकल बंद निळजे ते कळंबोली सात तासांचा पॉवर ब्लॉकपश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान मेगाब्लॉक

मुंबई - पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान तर हार्बर मार्गावर सकाळी 11 ते 4.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून ते 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे दिशेकडे जाणारी एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटापर्यंत चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटीच्या दिशेने जाणारी एकही लोकल धावणार नाही.

सीएसएमटी आणि वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या सकाळी 11 वाजून 34 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 23 मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेल ते सीएसएमटीच्या दिशेने जाणा-या सर्व लोकल सकाळी 9 वाजून 56 मिनिटांपासून ते संध्याकाळी 4 वाजून 16 मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी जम्बो ब्लॉक असेल. सकाळी 10.35 ते 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणा-या जलद मार्गावरील काही गाड्या रद्द होतील काही धिम्या मार्गावरून धावतील.



 

कल्याण-कसारा लोकल बंद

मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते सीएसएमटीदरम्यान मेगाब्लॉक नसेल. मात्र, शहाड येथील पादचारी पूल आणि इतर पायाभूत सुविधेच्या कामासाठी रविवारी सकाळी 10.45 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या वेळी कल्याण ते कसारा लोकलसेवा बंद असतील. ब्लॉकनंतर दुपारी 2 वाजून 19 मिनिटांची कल्याणहून आसनगावकडे लोकल रवाना होईल. सकाळी 10.37 ते दुपारी 1.59 वाजेपर्यंत कल्याण ते कसारा लोकलसेवा बंद असेल. मेगाब्लॉकनंतर दुपारी १ वाजून ३१ मिनिटांची कसारा ते सीएसएमटी लोकल चालविण्यात येईल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कल्याण-सीएमएसटी विशेष लोकल चालविण्यात येतील.


या गाड्या रद्द

डाउन मार्गावरील मेल, एक्स्प्रेस
गाडी क्रमांक ५११५३ मुंबई-भुसावळी पॅसेंजर.
गाडी क्र.१२०७१ दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस
गाडी क्रमांक १२११७ लोकमान्य टिळक-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस.
गाडी क्र.२२१०१ मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस.

अप मार्गावरील मेल, एक्स्प्रेस
-गाडी क्रमांक ५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर.
-गाडी क्रमांक १२११८ मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस.
-गाडी क्रमांक १२०७२ जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस.
-गाडी क्रमांक २२१०२ मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस.

हार्बरच्या प्रवाशांसाठी विशेष लोकल

पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाºया सर्व लोकल फे-या रविवारी सकाळी 9 वाजून 53 मिनिटांपासून ते दुपारी 2 वाजून 44मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे सकाळी 10.45 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4. 58 वाजेपर्यंत गोरेगाव आणि वांद्रेहून सीएसएमटीच्या दिशेने एकही लोकल धावणार नाही. पनवेल आणि कुर्ला या स्थानकांदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला फलाट क्रमांक 8 वरून विशेष लोकल फे-या चालविण्यात येतील.

निळजे ते कळंबोली सात तासांंचा पॉवर ब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावरील निळजे ते कळंबोली या स्थानकादरम्यान दोन्ही मार्गांवर रविवारी सकाळी 9 वाजून 50 मिनिटांपासून ते 4.50वाजेपर्यंत असा 7 तासांचा पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या पॉवर ब्लॉक दरम्यान अनेक पायाभूत कामे केली जातील. त्यानुसारच प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले.

या गाड्या रद्द

-गाडी क्रमांक ११०२५ भुसावळ-पुणे एक्स्प्रेस.
-गाडी क्रमांक ११०२६ पुणे-भुसावळ एक्सप्रेस.
- गाडी क्रमांक १२१२५ सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस.
- गाडी क्रमांक १२१२६ पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस.
-गाडी क्रमांक ६९१६८ वसई रोड-पनवेल मेमू.
- गाडी क्रमांक ६९१६७ पनवेल-वसई रोड मेमू.
वेळेत आणि थांब्यात बदल
डाउन मार्गावरील मेल, एक्स्प्रेस

- गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस पनवेलपासून चालविण्यात येईल.
-गाडी क्रमांक ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर पनवेलपासून चालविण्यात येईल.
- गाडी क्रमांक १२६१९ लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगलोर जंक्शन मत्स्यगंधा एक्स्प्रेस रविवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी रवाना होईल.
अप मार्गावरील मेल, एक्स्प्रेस
-गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर जेसीओ पनवेलपर्यंत चालविण्यात येईल.

Web Title: Jumbo block on Western railway and Harbor rail route 10 February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.