Join us

Mumbai Mega Block Update: तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या जम्बोब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 6:09 AM

Mumbai Train Status : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी तिन्ही मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी तिन्ही मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा, पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल ते माटुंगा रोड स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. तर, हार्बर मार्गावरील लोकल सेवा ब्लॉकदरम्यान रद्द करण्यात येणार आहे.मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगा दरम्यान सीएसएमटी दिशेकडे सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणारी जलद लोकल दिवा ते परळ स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येईल.हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी दरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या लोकल सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत रद्द करण्यात येतील. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ पर्यंत सीएसएमटीहून वाशी ते पनवेल दिशेकडे जाणाºया लोकल रद्द करण्यात येतील. सकाळी १०.२१ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेकडेच्या लोकल रद्द करण्यात येतील. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल विशेष लोकल चालविण्यात येतील.पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल ते माटुंगा रोड स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाºया जलद मार्गावर रविवारी जम्बोब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १०.३५ ते दुपारी २.३५ वाजेपर्यंत सांताक्रुझ ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.विशेष ‘दिवा’ लोकलरत्नागिरी ते दादर पॅसेंजर एक्स्प्रेस दिवा स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. तर, दादर ते रत्नागिरी पॅसेंजर एक्स्प्रेस दिवा स्थानकावरून चालविण्यात येईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी दादर स्थानकावरून दुपारी ३.४० वाजता दिवा लोकल चालविण्यात येईल.

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटलोकलमध्य रेल्वेहार्बर रेल्वेपश्चिम रेल्वे