म्हाडाच्या १७३ गाळ्यांच्या विक्रीसाठी २७ जूनला ई-लिलाव;
By सचिन लुंगसे | Published: June 14, 2024 11:26 PM2024-06-14T23:26:20+5:302024-06-14T23:26:31+5:30
अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी संगणकीय प्रणालीमध्ये २७ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणीकृत, अपेक्षित कागदपत्रे अपलोड केलेल्या व अनामत रकमेचा भरणा केलेल्या पात्र अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
मुंबई : म्हाडाच्या १७३ गाळ्यांच्या विक्रीसाठी २७ जून रोजी संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे.
अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी संगणकीय प्रणालीमध्ये २७ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणीकृत, अपेक्षित कागदपत्रे अपलोड केलेल्या व अनामत रकमेचा भरणा केलेल्या पात्र अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
२८ जून रोजी सकाळी ११ वाजता https://mhada.gov.in व www.eauction.mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
गाळ्यांच्या ई-लिलावामार्फत विक्रीसाठी २७ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र लोकसभा आचारसंहितेमुळे ई-लिलाव प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.
बदललेल्या वेळापत्रकानुसार ई-लिलावाची तारीख निश्चित करण्यात आला नव्हती. आता आचारसंहिता संपुष्टात आली असल्याने ई-लिलावाचा दिनांक व वेळ निश्चित करण्यात आली आहे.
कुठे किती गाळे
प्रतीक्षा नगर - शीव १५
न्यू हिंदी मिल - माझगाव २
स्वदेशी मिल - कुर्ला ५
गव्हाणपाडा - मुलुंड ८
तुंगा - पवई ३
कोपरी - पवई ५
मजासवाडी - जोगेश्वरी पूर्व १
शास्त्रीनगर - गोरेगाव १
सिद्धार्थ नगर - गोरेगाव १
बिंबिसार नगर - गोरेगाव पूर्व १७
मालवणी - मालाड ५७
चारकोप भूखंड क्रमांक एक - १५
चारकोप भूखंड क्रमांक दोन - १५
चारकोप भूखंड क्रमांक तीन - ४
जुने मागाठाणे बोरिवली पूर्व - १२
महावीर नगर कांदिवली पश्चिम - १२