रुफटॉप इंडिकेटरसाठी आता ३० जूनची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 07:51 AM2021-12-29T07:51:10+5:302021-12-29T07:52:30+5:30

Mumbai : टॅक्सी, टॅक्सी असे करत दुरुन येणाऱ्या टॅक्सीला थांबवावे लागण्याची वेळ मुंबईतील गर्दीच्या अनेक ठिकाणी प्रवाशांवर येते. त्यामुळे टॅक्सी मिळवणे हे मुंबईकरांसाठी एक दिव्य पार करण्यासारखेच असते.

June 30 is now the deadline for rooftop indicators on taxi | रुफटॉप इंडिकेटरसाठी आता ३० जूनची मुदत

रुफटॉप इंडिकेटरसाठी आता ३० जूनची मुदत

Next

मुंबई :  सर्व काळ्यापिवळ्या टॅक्सींवर रुफटॉप इंडिकेटर लावण्यासाठी चालकांना आता ३० जून २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने दिले आहे.

टॅक्सी, टॅक्सी असे करत दुरुन येणाऱ्या टॅक्सीला थांबवावे लागण्याची वेळ मुंबईतील गर्दीच्या अनेक ठिकाणी प्रवाशांवर येते. त्यामुळे टॅक्सी मिळवणे हे मुंबईकरांसाठी एक दिव्य पार करण्यासारखेच असते. कारण लांबून येणाऱ्या टॅक्सीला हात दाखवल्यानंतर अनेक टॅक्साचालक भाडे नाकारतात, तर कधी टॅक्सीमध्ये आधीच प्रवासी असतात; पण आता मात्र हा मनस्ताप लवकरच दूर होणार आहे. कारण टॅक्सींवर लावण्यात येणाऱ्या रुफटॉप इंडिकेटरमुळे भाडे स्वीकारणारीच टॅक्सी थांबवणे अगदी सोयीचे होणार आहे. 

टपावर असणार तीन दिवे
टॅक्सीवर हिरवा, लाल आणि पांढरा असे तीन दिवे लागणार आहेत. हिरवा दिवा सुरू असल्यास टॅक्सी भाडे घेण्यास उपलब्ध आहे, असे प्रवाशांनी समजावे. तर लाल दिवा असेल तर त्यात प्रवासी आहे, असे समजावे. त्याचवेळी पांढरा दिवा पेटता असेल तर टॅक्सी सध्या भाडे स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसेल असा त्याचा अर्थ होईल. हे दिवे एलईडी असणार असून प्रत्येक दिव्याचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून लिहिणे बंधनकारक असणार आहे. तर तिन्हीपैकी एक दिवा पेटता ठेवणेही गरजेचे असणार आहे.

Web Title: June 30 is now the deadline for rooftop indicators on taxi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxiटॅक्सी