ज्येष्ठ उर्दू शायर निदा फाजली यांचे निधन
By Admin | Published: February 9, 2016 04:20 AM2016-02-09T04:20:25+5:302016-02-09T04:20:25+5:30
ज्येष्ठ उर्दू साहित्यिक व शायर निदा फाजली यांचे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास वर्सोवा येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात
मुंबई : ज्येष्ठ उर्दू साहित्यिक व शायर निदा फाजली यांचे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास वर्सोवा येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. फाजली यांची ‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता, कभी जमीं तो कभी आसमां नही मिलता’, ‘होशवालो को खबर क्या..’, ‘तू इस तरह मेरी जिंदगी मे शामिल है’, ‘दुनिया जिसे कहते है’ आदी गझल रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या आहेत.
मुक्तिदा हसन निदा फाजली असे त्यांचे पूर्ण नाव होते. दिल्ली येथे एका काश्मिरी कुटुंबात १२ आॅक्टोबर १९३८ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी १९३८ मध्ये ग्वाल्हेर येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांना शायरीचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला होता. त्यांच्या जाण्याने उर्दू शायरीच्या विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)