ब्रीजवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या?  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 07:04 AM2018-04-04T07:04:58+5:302018-04-04T07:04:58+5:30

उड्डाणपुलावरून खाली पडल्याने जीतू या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी हा प्रकार वनराई परिसरात घडला. या प्रकरणी वनराई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अधिक चौकशी सुरू आहे.

 Junk's suicide by jumping on the bridge? | ब्रीजवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या?  

ब्रीजवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या?  

मुंबई  - उड्डाणपुलावरून खाली पडल्याने जीतू या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी हा प्रकार वनराई परिसरात घडला. या प्रकरणी वनराई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अधिक चौकशी सुरू आहे.
गोरेगावला पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर सकाळी १०.३०च्या सुमारास हा प्रकार घडला. प्रत्यक्षदर्शी माहुल कांबळे याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण त्या उड्डाणपुलावर आला. त्याने त्या वेळी टॉवेल आणि टी-शर्ट परिधान केले होते. त्याने पुलावरून खाली उडी मारली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत त्याला रुग्णालयात नेले, असे कांबळे म्हणाला.
‘एक मुलगा ब्रिजवरून पडल्याचा फोन वनराई पोलिसांना आला. त्यांनी घटनास्थळी धाव घेत जीतूला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला’, अशी माहिती परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘तो मुलगा पडला की त्याने आत्महत्या केली’, याची चौकशी आम्ही करत आहोत. त्याच्या नातेवाइकांबद्दल अद्याप कोणतीही माहिती आमच्याकडे आलेली नसून ओळख पटवायचे काम आम्ही करत आहोत, असेही राठोड यांनी नमूद केले.

Web Title:  Junk's suicide by jumping on the bridge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.