२१ डिसेंबरला गुरु आणि शनीची युती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 06:38 PM2020-12-18T18:38:05+5:302020-12-18T18:38:22+5:30
Jupiter and Saturn alliance : सूर्यास्तानंतर संध्याकाळी साडेसातपर्यंत ही घटना पाहता येईल.
मुंबई : येत्या २१ डिसेंबरला संध्याकाळच्या आकाशात गुरु आणि शनी या ग्रहांची युती होणार आहे. हे दोन्ही ग्रह तेव्हा एकमेकांपासून फक्त ०.१ अंशांवर आलेले पाहता येतील. सोमवारी सूर्यास्तानंतर संध्याकाळी साडेसातपर्यंत ही घटना पाहता येईल. या नंतर हे दोन ग्रह इतक्या जवळ थेट २०८० मध्ये येतील.
गुरु व शनी आकाराने सुर्यमालेतील पहिल्या, दुस-या क्रमाकांचे ग्रह आहेत. या ग्रहांमधील अंतर पौर्णिमेच्या चंद्राच्या व्यासापेक्षा पाच पटीने कमी होईल. ते साध्या डोळ्यांनी पाहता येईल. हे दोन्ही ग्रह वेगळे असल्याचे जाणावर नाही. ३१ मे २००० रोजी गुरु व शनी यांची युती झाली होती. मात्र ०.१ अंश एवढया कमी अंतरावर १६२३ साली आले होते. १२२६ मध्ये त्या आधी ते जवळ आले होते. आत आठ शतकांनी पुन्हा एकदा हा योग आला आहे. त्यानंतर १५ मार्च २०८० रोजी असा योग येईल. ही घटना पाहताना दुर्बिण असल्यास या दोन्ही ग्रहांची जोडी दिसेल. अन्यथा साध्या डोळ्यांनी हे दोन ग्रह एकच आहेत, असे भासेल.
दरम्यान, मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्राने सांगितले की, गुरु आणि शनीची युती होणार आहे. सोमवारी ही युती पाहता येईल. मात्र सोमवारी काय हवामान असेल यावर हे अवलंबून आहे. कारण सोमवारी सांयकाळी ढगाळ हवामान असेल तर मात्र ही युती पाहता येणार नाही. या दिवशीच्या हवामानाचा अंदाज घेऊनच केंद्राचा कार्यक्रम आखला जाईल.