मुंबई : वांद्रे ते वर्सोवा अंतर आता फक्त १० मिनिटांत कापता येणार आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंक बनविण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे. वांद्रे- वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचे कंत्राट रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि इटली अस्टालदी एस.पी.ए. यांना देण्यात आले आहे. पुढच्या पाच वर्षांत म्हणजे २०२३पर्यंत ९.६० किमी वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ७ हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे.
वांद्रे ते वर्सोवा रस्त्याने जाण्यासाठी ४० मिनिटे लागतात. मात्र, वांद्रे-वर्सोवा सी लिंक झाल्यास फक्त १० मिनिटांत हे अंतर पार करता येणार आहे. परिणामी, ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. सी लिंक बनविण्याच्या कामाला पावसाळ्यानंतर सुरुवात होणार असून, आॅक्टोबर महिन्यापासून प्रत्यक्षात काम हाती घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अभियंत्याकडून सांगण्यात आले. प्रकल्पाची डिझाईन, मॅनपॉवरचे एकत्रीकरण, आर्थिक बाजूचे एकत्रीकरण करून प्रकल्पाला सुरुवात होणार आहे.
या ९.६० किमी पुलाला जुहू चौपाटीवरून ३०० मीटर लांब केबल स्ट्रे पूलने जोडण्यात येणार आहे. सी लिंकला १.१७ कि.मी. वांद्रे कनेक्टर, १.८० कि.मी. कार्टर रोड कनेक्टर (टोल नाक्यासहित), २.८० कि.मी.चा जुहू कोळीवाडा (टोल नाक्यासहित), १.८० कि.मी. नाना-नानीपार्क (टोल नाक्यासहित) ४ कनेक्टर जोडण्यात येणार आहेत. या प्र्रकल्पाची एकूण लांबी १७.१७ किमी असणार आहे.प्रकल्पाचे मॉडेलरिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि इटली अस्टालदी एस.पी.ए. यांच्यातर्फे प्रकल्प अंमलात येणार टप्प्याटप्पाने कामे करण्यात येतीलमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बँकेतून कर्ज घेणार. त्यानंतर टोलद्वारे पैसे गोळा करून फेडले जाणार आहेत.काम पावसाळ्यानंतर सुरूविकासकाने ३५० कोटी रुपयांची कामांची हमी दिली आहे. प्रकल्पाची अंतिम मुदत आतापासून पाच वर्षे आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला आणि विकासकांना साडेचार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचा विश्वास. कामाला सुरुवात आॅक्टोबरपासून करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे डिझाईन, मॅनपॉवरचे एकत्रीकरण, आर्थिक बाजूचे एकत्रीकरण करून प्रकल्पाला सुरुवात.प्रकल्पाला उशीर झाल्यास विकासकाला दंड बसणार. प्रकल्प बनवित असताना किंवा बनल्यानंतर नुकसान झाल्यास दंड.केबल पूलवांद्रे - वर्सोवा यांना जोडणारे ५ लहान केबल स्ट्रे पूल असतील. हे पूल केबलद्वारे उभारण्यात येणार आहेत.बोट, जहाज जाण्यासाठी पिलर्सचा (खांब) वापर टाळण्यात येणार.सी-लिंकवरून जाताना कमीतकमी १३० रुपये टोल असेल.वांद्रे ते वर्सोवा एकमार्गी रस्त्यांसाठी जवळपास २५० रुपये टोल असेल.टोल नाकावांद्रे - १२ टोल नाके प्रत्येक दिशेकडील जाणाऱ्या मार्गाकडे.वर्सोवा - ९ टोल नाके प्रत्येक दिशेकडील जाणाºया मार्गाकडे.वांद्रे ते वर्साेवा रस्त्याने जाण्यासाठी ४० मिनिटे लागतात. मात्र, हा सी-लिंक झाल्यास फक्त १० मिनिटे लागणार असून,३० मिनिटांचा कालावधी वाचणार आहे.10 किमी एकूण लांबी असलेला पुलाला जुहू चौपाटीवरून ३०० मीटर लांब केबल स्ट्रे पुलाने जोडले जाणार आहे.नानानानी पार्क, कार्टन रोड, जुहू कोळीवाडा, वर्सोवा यांना स्वतंत्र कनेक्टरने जोडले जाणार आहे.महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारवांद्रे-वरळी सी लिंक, वांद्रे स्थानक, कार्टर रोड, लिंकिंग रोड, जुहू तारा रोड, मुंबई विद्यापीठ, बीकेसी, जुहू विमानतळ, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोकीळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय, वर्सोवा मेट्रो रेल्वे स्थानक.