जरा जपून वागा बरं... समृद्धी महामार्गावर 'रील्स' बनवाल तर तुरुंगवास अन् दंडही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 02:46 PM2023-08-21T14:46:37+5:302023-08-21T14:47:10+5:30

समृद्धी महामार्ग सुरू करण्यात आल्यापासून अपघातांच्या घटनांनी महाराष्ट्रभर चर्चेत आहे.

Just be careful... If you make reels on Samriddhi highway, jail and fine too | जरा जपून वागा बरं... समृद्धी महामार्गावर 'रील्स' बनवाल तर तुरुंगवास अन् दंडही

जरा जपून वागा बरं... समृद्धी महामार्गावर 'रील्स' बनवाल तर तुरुंगवास अन् दंडही

googlenewsNext

मुंबई/नागपूर - देशातील सर्वात गतीमान पद्धतीने बनविण्यात आलेला मेगा हायवे प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाची चर्चा होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या महामार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रवाशांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलूपर्यंत सुरू करण्यात आला होता. आता, ८१ किमीचा दुसरा टप्पाही खुला करण्यात आला होता. त्यामुळे, या महामार्गावर प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. आता, प्रवाशांची वाढती वर्दळ आणि होणारे अपघात लक्षात घेऊन प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

समृद्धी महामार्ग सुरू करण्यात आल्यापासून अपघातांच्या घटनांनी महाराष्ट्रभर चर्चेत आहे. गेल्या काहि महिन्यांत या महामार्गावरील अपघातात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन महिन्यांपूर्वीच येथील महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला होता, त्यामध्ये २५ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. त्यामुळे, या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी शासन व प्रशासनाकडून खबरदारी आणि उपाय करण्यात येत आहेत. त्यातच, आता समृद्धी महामार्गावर रिल्स बनवणाऱ्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागेल. 

सोशल मीडियावरील इन्फ्लुर्स किंवा सोशल मीडियावरुन आपल्या मित्र-मैत्रिणींना दाखवण्यासाठी, चाहत्यांसाठी अनेकजण रिल्स बनवतत असतात. अनेकदा पर्यटनाला जाताना, पर्यटनस्थळाचेही रिल्स बनवले जातात. त्यामुळेच, आता समृद्धी महामार्गावर रिल्स बनवणाऱ्यांसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर रिल्स काढणाऱ्यांना ५०० रुपये दंड आणि १ महिना कारावासाची शिक्षा करण्यात येईल. महामार्ग वाहतूक पोलिसांनी याबाबत माहिती देत प्रवाशांना इशारा दिला आहे. 

समृद्धी महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा १२० किमी प्रतितास एवढी आहे. या वेगाने वाहने येत-जात असतील तर वाहतुकीला कुठलाही अडथळ नाही पाहिजे. रिल्स बनवताना किंवा महामार्गावर इतर कुठल्याही शूट करताना अडथळा होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता असते. म्हणूनच, खरबरदारीचा उपाय म्हणत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

समृद्धी महामार्गावर वाहन थांबवून रिल्स बनवणे किंवा व्हिडिओ शूट करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार, कलम ३४१ नुसार १ महिना कारवास किंवा ५०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, २८३ या कलमान्वये सार्वजनिक रस्त्यावर धोका किंवा असुविधा निर्माण होईल, असा आरोप ठेवत संबंधित वाहनचालक वा प्रवाशांवर २०० रुपये दंडासह कारावासाची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

Web Title: Just be careful... If you make reels on Samriddhi highway, jail and fine too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.