Join us

नुसतीच वेगवान प्रवासाची स्वप्ने, पण ‘पी’चे काय?; यंत्रणांच्या गोंधळात जीव टांगणीला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 5:30 AM

मुंबईतल्या महत्त्वाच्या मार्गावर काही टप्प्यांवर प्रवाशांकरिता विशेषत: महिला आणि अपंग प्रवाशांकरिता स्वच्छ अशा सार्वजनिक शौचालयांची गरज

मुंबई :  

मुंबई शहरातील फोर्ट ते सायन असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, सायन ते ठाणे असा लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला ते अंधेरी, कुर्ला ते सांताक्रूझ आणि पश्चिम, पूर्व द्रुतगती मार्गांवर मोजक्या ठिकाणी सार्वजनिक शौचालये असून, तीदेखील सुस्थितीत नाहीत. मुंबईतल्या महत्त्वाच्या मार्गावर काही टप्प्यांवर प्रवाशांकरिता विशेषत: महिला आणि अपंग प्रवाशांकरिता स्वच्छ अशा सार्वजनिक शौचालयांची गरज असून, त्यांच्या उभारणीबाबत महापालिका, एमएमआरडीए, बांधकाम खात्याचा निरुत्साह कुंचबणेचे कारण आहे. 

पश्चिम द्रुतगती मार्ग वांद्र्यापासून दहिसरपर्यंत केवळ दाेन ते तीन ठिकाणी शौचालये आहेत. मालाडला दिंडोशी फ्लायओव्हरजवळ व अंधेरी फ्लायओव्हर खाली एक शौचालय आहे. इतरत्र कोठेही शौचालय नाही. 

पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबई महापालिकेने घाटकोपर येथे पोलीस पेट्रोल पंप व पंतनगर बस डेपोकडून फ्लायओव्हर खालून जाताना घाटकोपर पंपिंग स्टेशनच्या बाजूला एक शौचालय बांधले आहे. इतरत्र कोठेही शौचालय नाही. महापालिकेने ठराविक अंतरावर अशी शौचालये उभारली पाहिजेत. शौचालय नसल्याने सर्वाधिक कुचंबणा होते ती महिलांची. त्याचबरोबर, रस्त्यावर ड्यूटी करणाऱ्या वाहतूक पोलिसांचीही शौचालयांअभावी अडचण होते.अशी आहे अवस्था- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर परळ पुलाखाली असलेले सार्वजनिक शौचालये कधीच साफ नसते. पान, गुटख्याच्या मारलेल्या पिचकाऱ्यांनी शौचालयाची दुरवस्था झाली आहे.- कुर्ला - सांताक्रूझ - चेंबूर लिंक रोडवरील कुर्ला डेपो येथे पुलाखाली असलेल्या शौचालयात कायमच आगंतुकांनी ठाण मांडलेली असते. - लाल बहादूर शास्त्री मार्गावर सायनपासून घाटकोपरपर्यंत प्रवास करताना कुठेच शौचालय नाही. त्यामुळे कलिना येथील मिठी नदीच्या परिसरात आडोशाला कित्येक वेळा शौच केली जात असल्याने परिसर गलिच्छ झाला आहे.- मलबार हिल हॅगिंग गार्डनच्या बाहेर सार्वजनिक शौचालय असून, तेथेही यथातथाच व्यवस्था आहे.- वांद्रे, माहीम आणि बीकेसी विशेषत: बीकेसी परिसरात ठराविक अंतरावर पुरेशी शौचालये नसल्याने मिठी नदीच्या परिसरात आडोशाला शौचास बसतात. 

टॅग्स :रस्ते सुरक्षारस्ते वाहतूकमुंबई